
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शनाचा सोहळा येत्या 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ओल्ड गोव्यात 46 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. 'गोंयचा सायब' अशी ओळख असणाऱ्या झेवियर यांच्या या दशवार्षिक सोहळ्यासाठी देश-विदेशातून भाविकांसह पर्यटक हजेरी लावणार आहेत.
फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळा लाईव्ह पाहता येईल का?
नाही. ४६ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमींग होणार नाहीये. मीडियासाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल बोलताना प्रदर्शन समितीचे निमंत्रक हेन्री फाल्काओ यांनी सांगितले की, ''सोहळ्याच्या दिवशी मीडियासाठी एक विशिष्ट जागा उपलब्ध करुन दिली जाईल. मात्र मीडियाला केवळ उद्घाटन सोहळ्याचे कव्हेरज करण्याची परवानगी असेल. संपूर्ण 46 दिवसांच्या सोहळ्याचे प्रसारण करता येणार नाही. तसेच, बॅसिलिका आणि से कॅथेड्रलच्या आतील भागाचे चित्रीकरणासाठी मीडियाला परवानगी असणार नाही.''
गोव्यात फ्रान्सिस झेवियर यांचा शवदर्शन सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शवदर्शन सोहळा स्थानिक पंचायतीच्या माध्यमातून व्यवस्थापित केला जातो, त्याचा चर्चशी काहीही संबंध नाही, असे हेन्री यांनी नमूद केले. दरम्यान, शवदर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचे हेन्री यांनी सांगितले. हेन्री यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक स्टॉल मालकाकडे फायर सेफ्टी सयंत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शवदर्शन समिती संत फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवनावर आधारित एका ऑपेरेटाचे आयोजन करणार आहे, ज्याला पोरगोटनार असे (Porgotnnar) म्हणतात. ऑपरेटाचे कोकणीमध्ये नऊ शो नियोजित आहेत. तसेच, स्किट्स आणि नाटकांचे देखील आयोजन करण्यात येणार हे. याशिवाय, 27 डिसेंबर 2024 रोजी शिलाँग चेंबर कॉयरचा एक कार्यक्रम असेल जो गोव्यातील दोन ग्रुपसोबत से कॅथेड्रलच्या लॉनवर सादर केला जाईल.
जुन्या गोव्यातील संत फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तला उपस्थित राहणाऱ्या सर्व अभ्यागत/भक्तांनी चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी वैध ओळखपत्र/आयडी पुरावा बाळगणे आवश्यक आहे.
चर्चमध्ये जाताना पिशव्या, हँडबॅग किंवा अतिरिक्त सामान घेऊन आत जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
फेस्तच्या काळात चर्च परिसरात किंवा आसपासच्या भागात कोणत्याही अभ्यागत/भक्ताला संशयास्पद वस्तू/व्यक्ती किंवा कोणतीही असामान्य क्रिया दिसल्यास, तात्काळ जुने गोवा पोलीस स्टेशन/पोलीस आउट पोस्टला 100/112 या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.