VIDEO: आसगावात अग्नितांडव! चार कामगार होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक, गोमेकॉत उपचार सुरू

Assagao Fire: आसगाव येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या बांबू आणि गवताच्या हस्तकला वस्तूंच्या दुकानाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागून चौघे कामगार गंभीररीत्या भाजले.
Assagao Fire
Assagao FireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: आसगाव येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या बांबू आणि गवताच्या हस्तकला वस्तूंच्या दुकानाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागून चौघे कामगार गंभीररीत्या भाजले. यातील रत्नेश चव्हाण याची प्रकृती चिंताजनक असून, सर्व जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

समोरच असलेल्या फादर ॲग्नेल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी जीवाची बाजी लावून कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. संजय मडगावकर (५०, रा. आसगाव), सूरज चव्हाण (२५, रा. उत्तर प्रदेश), रत्नेश चव्हाण (१९, रा. उत्तर प्रदेश) आणि संदेश सावंत (५४, रा. म्हापसा) अशी जखमींची नावे आहेत. गंभीररीत्या भाजलेल्या रत्नेश चव्हाण याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानात ठेवलेल्या बांबू आणि गवतापासून तयार केलेल्या हस्तकला वस्तूंनी पेट घेतल्याने संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्या, तर दुकानाशेजारी उभी असलेली एक कारही आगीच्या तडाख्यात सापडली. घटनेच्या वेळी चारही कामगार दुकानात अडकले होते.

समोरच असलेल्या फादर ॲग्नेल इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरपंच हनुमंत नाईक आणि स्थानिक नागरिकांनी इन्स्टिट्यूटमधील अग्निशामक यंत्रे तसेच शेजारील जलतरण तलावातील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुकानात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. एका कामगाराने स्वतःची सुटका करून घेतली.

Assagao Fire
Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

दलाच्या विलंबावर स्थानिकांची नाराजी

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागला. या विलंबामुळे आग पसरण्यास व गोदामातील साहित्य जळून खाक होण्यास वाव मिळाला. वेळेत अग्निशमन दल पोहोचले असते तर नुकसान कमी झाले असते.

Assagao Fire
Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

सर्व वस्‍तू जळाल्‍या

दुकानातील बांबू आणि गवताच्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या. दुकानात असलेल्या दोन दुचाकींनाही आगीने वेढले. शेजारी उभी असलेली एक कारही आगीच्या विळख्‍यात सापडली.

विद्यार्थी आणि नागरिकांचे धाडस

आगीची घटना घडताच फादर ॲग्नेल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी संस्थेतील अग्निशामक यंत्रे आणि शेजारील जलतरण तलावातील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुकानात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीही त्यांनी जीवाची बाजी लावली. त्यांच्या तत्परतेमुळे बचावकार्याला तातडीने सुरुवात होऊन मोठी दुर्घटना टळण्यास मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.