Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट... सत्तरी तालुक्यातील हजारो वारकरी पंढरपुरात दाखल

हरिनाम, विठ्ठलाच्या जयघोषात लहानांपासून, थोर, महिला, युवक - युवती वारकरी भक्त पायी वारी प्रवास करत उन्हा-पावसात नाचत गात पंढरपुरला पोहचले.
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi: विठ्ठल भक्तांना कित्येक महिन्यापांसून प्रतीक्षा होती, ती आषाढी एकादशीची. हरिनाम, विठ्ठलाच्या जयघोषात लहानांपासून, थोर, महिला, युवक - युवती वारकरी भक्त पायी वारी करून १२-१३ दिवसांचा प्रवास करत उन्हा-पावसात नाचत गात अखेर पंढरपुरला पोहचले. तर काही जण उद्या मंगळवारी पोहचणार आहेत. सत्तरीतून हजारोंच्या संख्येने यंदा वारकरी रवाना झाले आहेत.

विठ्ठल भक्तीत लीन झालेल्या वारकऱ्यांचा महीमा अपरंपार आहे. महाराष्ट्राबरोबर गोव्यातूनही अनेक वारकरी वर्षांपासून दरवर्षी खंड न पाडता वारीला जात असतात. पूर्वी वाहतुकीची साधन नव्हती. तरीही देवावर असलेली श्रध्दा त्यामुळे कित्येक मैल चालत रात्रंदिवस करत वारी पूर्ण करत असत.

कालांतराने रस्ते आले, वाहतुकीची सोय झाली तरीही पायी वारी अव्याहतपणे सुरू आहे. सत्तरीतील उस्ते, कोदाळ, करमळी, केरी, तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरला गेले आहेत. काहीजण रविवारी पोहचले, तर काही सोमवारी तर काही उद्या मंगळवारी पंढरपूरला पोहचतील. उन्हा-पावसाची तमा न बाळगता पंढरीत पोहचले. त्यामुळे भक्तांनी आनंद व्यक्त केला.

Ashadhi Ekadashi 2023
Bicholim News : सम्राट संगीत सितारा’ स्‍पर्धेची महाअंतिम फेरी 22 जुलैला; यंदा 18 वे पर्व

गेल्या १३ दिवसांपासून पायी वारी करताना विठ्ठलाच्या हरिनामाच्या जपाने पंढरपुरला कधी पोहचलो हे कळलेच नाही. माझी मुले लहान आहेत, वारीत मुलांसमवेत आम्ही पायी वारी करतो आहोत. आज पंढरपुरला पोहचून समाधान वाटत आहे. पायी येताना अनेक अडचणी आल्या. मात्र, देवाने सर्व अडचणी दूर करून त्याच्या जवळ आम्हाला सुखरुप आणून पोहचवले आहे. त्यामुळे देवावरची श्रध्दा व प्रेम आणखी वाढले आहे.

प्रदीप गावकर - उस्ते येथील श्रीराम वारकरी मंडळ

Ashadhi Ekadashi 2023
Goa News : आला पावसाळा, आरोग्य सांभाळा; दवाखान्यात सर्दी, तापाचे वाढले रुग्ण

सत्तरीतून लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत महिला व पुरुष यांचा वारीत दिवसेंदिवस सहभाग वाढत आहे. हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. येणाऱ्या दिवसातही अशा प्रकारे देवावरची श्रध्दा कायम रहाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आज पंढरपूरला पोहचून देवाच्या भक्तीत विलिन व्हायचे आहे. मला या ठिकाणी आपली कला सादर करण्याचे भाग्य प्राप्त होत असल्याने अत्यंत आनंद होत आहे.

रोहिदास गावकर, पाली-सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com