E20 Fuel Goa: "गोव्यात आपचं सरकार आल्यास 5 दिवसांत ई-20 इंधन बंद करणार!" केजरीवालांची गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा

E20 Fuel Impact on Vehicles: ‘ई-२०’ इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो आणि मायलेज कमी होऊ शकते.
E20 Fuel Impact on Vehicles
E20 Fuel GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘ई-२०’ इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो आणि मायलेज कमी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नवीन पेट्रोल किंवा डिझेलची वाहने खरेदी करू नयेत.

गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास ५ दिवसांत ‘ई-२०’चा वापर बंद करू, अशी घोषणा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली.

E20 Fuel Impact on Vehicles
Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

‘ई-२०’ इंधनाची सक्ती का?

मोदी सरकारने ‘ई-२०’ इंधन सक्तीने लागू केले. त्यामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले असून इंजिनशी संबंधित दुचाकींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.

गोव्यातील सुमारे ४५ टक्के लोकांकडे कार आहेत, तर जवळपास ८६ टक्के लोकांकडे दुचाकी आहेत. त्यामुळे सुमारे ८५ ते ९५ टक्के वाहनांवर ‘ई-२०’ इंधनाचा परिणाम झाल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com