Artificial Intelligence in School of Goa: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)म्हणजे कृत्रिम बुदि्धमत्ता हा शब्द अलीकडच्या काळातील परवलीचा शब्द झाला आहे. ओपन एआय चॅट जीपीटी आणि गूगल बार्ड या एआय बॉटमुळे तर तंत्रज्ञानात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
त्याचा परिणाम मानवी जीवनावरही होत आहे. त्यामुळेच आजकाल सर्वांच्या तोंडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द असतो.
GBSHSE चा निर्णय
आता याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे गोव्यातील शाळांमध्ये देण्यात येणार आहेत. एक अतिरिक्त विषय म्हणून 2023-2024 या शैक्षणिक वर्षापासून या विषयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नववीच्या वर्गासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अतिरिक्त विषय असणार आहे. गोवा बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एज्युकेशन (GBSHSE) ने हा निर्णय घेतला आहे. 9 वी पासून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
प्रॅक्टिकलसाठी 60 गुण
बोर्डाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, National Skills Qualifications Framework (NSQF) योजनेप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हा विषय अतिरिक्त विषय म्हणून शिकवला जाईल.
9 वीच्या वर्गातील जे विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा पर्याय निवडतील त्यांच्याकडे 40 गुणांची थिअरी (पहिल्या टर्मसाठी 20 आणि दुसऱ्या टर्मसाठी 20) आणि 60 गुणांचे प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) (पहिल्या टर्मसाठी 30 गुण आणि दुसऱ्य टर्मसाठी 30 गुण) असेल.
आठवड्यात तीन तास
नववी आणि अकरावीच्या वर्गासाठी आयसीटीचा सध्याचा अभ्यासक्रम देखील अद्ययावत केला आहे. 9 वी आणि 11 वीच्या वर्गात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयासाठी दर आठवड्यात 33 मिनिटांचे तीन सत्र असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.