Electric Two Wheelers in Goa: गोव्यात ई-दुचाकींचा टक्का वाढला; एकूण दुचाकींपैकी 15 टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रिक

देशात एकूण दुचाकींपैकी 5.63 टक्के इलेक्ट्रिक
Electric Two Wheelers in Goa
Electric Two Wheelers in GoaDainik Gomantak

Electric Two Wheelers in Goa: गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे रस्त्यावर धावणाऱ्या 15 टक्क्यांहून अधिक दुचाकी इलेक्ट्रिक आहेत. तर, महाराष्ट्रात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे.

यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीतील वाहनांच्या डॅशबोर्डच्या डेटावरून ही बाब समोर आली आहे.

31 मे पर्यंत भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकींपैकी 5.63 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी आहेत. 2022 मध्ये, फक्त 4.05 टक्के दुचाकी इलेक्ट्रिक होत्या. 2023 च्या पहिल्या पाच महिन्यांत देशात 3,92,681 ई-टू-व्हीलरची विक्री झाली.

Electric Two Wheelers in Goa
Digambar Kamat: आमदार दिगंबर कामत यांना पुन्हा आठवला 'देव'; वाचा काय म्हणाले...

2030 पर्यंत एकूण दुचाकींमध्ये 80 टक्के ई-टू-व्हीलर असण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या अर्थाने हा वेग चांगला आहे. सन 2019 मध्ये देशातील कोणत्याही राज्यात ई-टू-व्हीलरचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते.

परंतु राज्यनिहाय आकडेवारीनुसार काही राज्ये यात चांगले प्रयत्न करताना दिसत आहेत.

ई-टू-व्हीलरचा सर्वाधिक वाटा गोव्यात दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात 31 मे पर्यंत सर्वाधिक 76,304 ई-टू-व्हीलरची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 117,557 ई-टू-व्हीलरची विक्री झाली होती.

दहा राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त ई-टू-व्हीलर दिसून आली. या राज्यांमध्ये गोवा (17.20 टक्के), केरळ (13.66 टक्के), कर्नाटक (12.19 टक्के), महाराष्ट्र (10.74 टक्के), गुजरात (8.70 टक्के), राजस्थान (7.15 टक्के), आंध्र प्रदेश (6.44 टक्के), छत्तीसगड (6.32 टक्के), तामिळनाडू (6.31 टक्के) आणि ओडिशा (6.17 टक्के) यांचा समावेश आहे.

Electric Two Wheelers in Goa
Goa G20 Meetings 2023: अभिमानास्पद! G20 बैठकीत गोमंतकीय महिलेने केले अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व

सन 2022 मध्ये एकूण 630,893 ई-टू-व्हीलरची विक्री झाली होती, ज्यामध्ये या 10 राज्यांचा वाटा सुमारे 78 टक्के होता.

परंतु एकूण दुचाकी विक्रीत त्यांचा वाटा 52 टक्के इतकाच राहिला. ई-टू-व्हीलर विक्रीला कर सवलत, स्वस्त वीज, भक्कम चार्जिंग यंत्रणा, स्क्रॅपिंग प्रोत्साहन, बॅटरी रिसायकलिंगमध्ये गुंतवणूक या कारणांमुळे लोक ई-व्हेईकल्सकडे वळत आहेत.

ई-टू-व्हीलर ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत एकूण 1,287 ई-टू-व्हीलरची विक्री झाली.

झारखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये 2022 मध्ये एकूण दुचाकींमध्ये ई-टू-व्हीलरचा वाटा 1 टक्क्यांपेक्षा कमी होता. पण 2023 च्या पहिल्या पाच महिन्यांत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com