
पणजी: क्रिकेटर, अभिनेते गोव्यातील आपली मालमत्ता भाडेपट्टीवर देण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. आता त्यात भर पडली आहे ती अभिनेता अर्शद वारसी याची. अभिनेता अर्शदने गोव्यात आसगावमध्ये पोर्तुगीजकालीन घर घेऊन त्याचे नूतनीकरण केले आहे. या घरात एक रात्र राहण्यासाठी ७५ हजार रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे पर्यटन खात्याच्या यादीत या घराचे ‘कासा झेन’ हे नाव नोंद झाले आहे.
दिल्लीतील लोक ‘सेकंड होम’ म्हणून गोव्याकडे पाहत असले, तरी अनेक चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेटर त्यांच्याच पंक्तीत येऊन बसले आहेत. गोवा सर्वदृष्टीने सुरक्षीत आणि विकसित राज्य बनल्याने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
त्यामुळे दिल्लीकर या राज्याकडे वळले आहेत. अनेक दिल्लीकरांनी गोव्यात येऊन येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि झाले आहेत. त्यांच्याच पाठोपाठ नंबर लागतो तो क्रिकेटर, बॉलिवूड कलाकारांचा. क्रिकेटपटूंनी गोव्यात केलेली गुंतवणूक ही त्यांच्यासाठी जोड व्यवसाय बनला आहे. युवराज सिंग यानेही आपला बंगला भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंगही करता येते.
अनेक अभिनेत्यांनी गोव्यात मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. त्यापैकी ‘सर्किट’ फेम अर्शद वारसी या अभिनेत्याने गोव्यात आसगाव येथे पोर्तुगीजकालीन घर खरेदी केले आणि त्याचे नूतनीकरण केले. त्या घराला ‘कासा झेन’ असे नाव देण्यात आले असून, ते पर्यटन खात्याकडे नोंद करण्यात आले आहे.
अर्शद वारसीच्या या घराच्या परिसरात पोहण्याचा तलाव, हिरवळ, झाडी, घरात असणाऱ्या सुविधा वैगरे दाखविणारी क्लिप अर्शने आपल्या समाज माध्यमांच्या साईटवर टाकली आहे. पोर्तुजकालीन या घराचे नूतनीकरण करण्यात आले असून ते अनेकांचे आकर्षण ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.