
भारताची पहिली जागतिक 'ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट समिट' (WAVES २०२५) गेल्या आठवड्यात मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये संपन्न झाली. जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात ७७ राष्ट्रांचा सहभाग होता.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी, दोन मे रोजी झालेल्या सोहळ्यात म्हापसा येथील श्री साई बोडगेश्वर घुमट आरती मंडळ यांच्या प्रतिभावान घुमट वादक कलाकारांचा समावेश होता.
‘दोन मे रोजी सकाळी दिवसाच्या शुभारंभी सर्व राज्यांमधील लोककलाकारांचा एक 'फ्युजन' कार्यक्रम सादर केला गेला होता. या कार्यक्रमात तालवाद्यांनी जो ताल बहाल केला त्यात आम्ही वाजवलेल्या घुमट वाद्यांचा ताल देखील समाविष्ट होता. घुमटांबरोबरच समेळ आणि कासाळे याचीही साथ आमच्या ग्रुपमधील कलाकारांनी दिली.
या कार्यक्रमाद्वारे अनेकांना गोव्याच्या घुमट या वाद्याची ओळखही झाली. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक जणांनी या वाद्याची चौकशी आवर्जून केली. त्यांना आम्ही गोव्याच्या या वारसा वाद्याबद्दल माहिती दिली. गोव्यात आम्ही अनेक ठिकाणी घुमट वादन करतो मात्र जेव्हा अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तेव्हा ती अभिमानाची बाब असते.
या कार्यक्रमाची तालीम मुंबईमध्येच प्रसन्ना गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस चालली होती. तेजस कुंकळ्ळकर, विजय कुडणेकर, दिनेश आमोणकर, शुभम हळर्णकर, शंकर कारेकर, वंश सावंत हे कलाकार घुमट वादक संचाचे भाग होते.
तेजस कुंकळ्ळकर, श्री साई बोडगेश्वर घुमट आरती मंडळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.