Arpora Nightclub Fire: लुथरा बंधूंना 'बेल' नाही, 'जेल'च! जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Luthra Brothers: सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंनी दाखल केलेला जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला.
Luthra Brothers
Luthra BrothersDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मधील अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंनी दाखल केलेला जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला.

त्यामुळे लुथरा बंधूंचा कोलवाळ कारागृहातील मुक्काम वाढला आहे. ६ डिसेंबर २०२५ च्या रात्री बर्च क्लबला भीषण आग लागली होती. यात क्लबमधील कर्मचारी आणि पर्यटकांसह मिळून २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता.

Luthra Brothers
Goa Temple Theft: वेेरेत मंदिराची काैले काढून चोरांनी फंडपेटी केली लंपास, चौघा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

अश्रू झाले अनावर

म्हापसा सत्र न्यायालयाने आज लुथरा बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला. सुनावणीला संशयित लुथरा बंधूंच्या पत्नींसह बहीण आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. दोघांचाही जामीन फेटाळल्याने नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

न्यायालयात काय घडले?

गुरुवारी सायंकाळी सुनावणीवेळी लुथरा बंधूंचे नातेवाईक तसेच सरकारी आणि संशयितांची बाजू मांडणाऱ्या वकिलांची टीम न्यायालयात हजर होती. दिल्लीतील पीडित पर्यटक जोशी कुटुंबीयांचे दोघे सदस्यही आज उपस्थित होते.

संशयितांचे वकील ॲड. पराग राव म्हणाले की, न्यायालयाने जामीन अर्ज कोणत्या कारणावरून फेटाळला, हे निवाड्याची प्रत मिळाल्यानंतरच समजेल. आम्ही त्यावर अभ्यास करू. अशिलांच्या संमतीनंतरच वरिष्ठ न्यायालयात या निवाड्याला आव्हान देण्याचा निर्णय घेऊ.

Luthra Brothers
Goa Road Safety: रस्त्यांवर नियम पाळा, जीव वाचवा! होंडा येथे रस्ता सुरक्षा जनजागृती

जोशी कुटुंबीयांतर्फे ॲड. सुहास जोशी म्हणाले की, न्यायालयाने लुथरा बंधूंचा जामीन नामंजूर केल्याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या कुटुंबीयांसाठी हा न्यायाचा दिवस आहे.

संशयितांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com