Goa Jobs : गोव्यात तब्बल 2 लाख नोकऱ्यांची संधी

येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा गोमंतकीयांना लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Job Opportunities in Goa : येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे गोमंतकीयांनी सोने करावे, अन्यथा बाहेरील लोक येऊन त्याचा फायदा घेतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. या संधीचे सोने केल्यास गोव्यात कुणीही बेरोजगार राहणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मंगळवारी, साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या बेती येथील कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की पर्यटनाशी निगडित पदवीसोबत, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वतःला अद्ययावत केले पाहिजे. यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या सरकारने औद्योगिक संघटनेच्या 35 संस्थांसोबत करार करीत आयटीआय विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देते. याच धर्तीवर हॉटेल औद्योगिक संस्थांशी करार केला आहे. जेणेकरून फ्रंट डेस्क व आदरातिथ्य क्षेत्रात तीन ते सहा महिने प्रशिक्षण देऊन तिथेच संबंधितांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, बेतीप्रमाणे साळगावमध्येही लवकरच नवीन कार्यालय उघडले जाईल. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांच्यामुळे माझी ताकद आणखी वाढल्याचे आमदार केदार नाईक म्हणाले.

या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, साळगाव भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश घाडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काही जुन्या तसेच नवीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये रिव्होल्युशनरी गोवन्सच्या काही सदस्यांचा समावेश होता.

CM Pramod Sawant
Goa Accident : अपघातांचे कारण दारू नव्हे रस्ते

‘स्थानिकांनी नोकऱ्यांचा लाभ घ्यावा’

सरकारी नोकरीत सर्वांनाच नोकऱ्या मिळू शकत नाहीत. मात्र, कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के नोकऱ्या देण्याची ताकद सरकार तसेच खासगी उद्योग क्षेत्राकडे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, की पर्यटन क्षेत्राच्या आदरातिथ्य, आयटी, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सिटी तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत होत आहे. त्याचा फायदा गोमंतकीय युवकांनी घ्यावा. आसाम तसेच इतर राज्यांतील युवक हे गोव्यात ‘व्हाईट कॉलर जॉब’ करतात. या संधीचा स्थानिकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

‘कारवाया खपवून घेणार नाही’

पीएफआयच्या काही सदस्यांना अटक झाल्याने काही राजकारण्यांच्या पोटात दुखत आहे. मुळात देशविरोधी कारवाया आम्ही खपवून घेणार नाही. याशिवाय अकारण कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आमचे सरकार घेते. गोव्यातील मुस्लिम व ख्रिश्चन हे एकोप्याने इथे नांदतात. मुळात राज्यात जातीभेद किंवा धर्मासाठी कधीही भांडण झालेले नाही आणि यापुढे तसा कुणीही प्रयत्न करू नये. मात्र, स्वतःच्या हितासाठी काही राजकारण्यांना भांडण लावण्यातच रस असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa municipal elections ward delimitation 2026
goa cm pramod sawant peons warning
goa digital arrest fraud ed arrest
goa bjp state executive meeting 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com