Outline Development Plans: 'ओडीपी' प्रश्‍नी बाबूश-विश्‍वजीत यांच्यात वाद; तानावडेंची यशस्वी शिष्टाई

Goa TCP: दोन्ही मंत्र्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद शमला नसल्याचे दिसून आले
Goa TCP: दोन्ही मंत्र्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद शमला नसल्याचे दिसून आले
Babush Monserrat, Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खात्याविषयी म्हापशातील बैठकीत व्यक्त केलेली नाराजी आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी आपण सर्वांचीच कामे केली, असे सांगून सर्वांची तोंडे बंद करण्याचा केलेला प्रयत्न यातून वाढलेली कटुता दोन दिवस कायम राहिली होती.

अखेरीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना मध्यस्थी करत हा वाद मिटवावा लागला.

हा वाद वाढणार, असे दिसत असतानाच दोन्ही बाजूंकडून आलेली वक्तव्ये आज चक्रावणारी ठरली होती. मोन्सेरात यांनी बाह्यविकास आराखडाप्रश्नी विश्वासात घेतले जात नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद शमला नसल्याचे दिसून आले. त्यानंतर राणे यांनी प्रत्युत्तर दिले. मी आमदारांच्या सल्ल्यानुसारच कामे करतो. कॉंग्रेसच्या आमदारांनीही सुचवलेली कामे केली, असे ते म्हणाले. याला मोन्सेरात यांनी प्रत्युत्तर दिले असते तर वाद चिघळला असता.

Goa TCP: दोन्ही मंत्र्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद शमला नसल्याचे दिसून आले
Babush Monserrat: बाबूशना गोमेकॉतून मिळाला डिस्‍चार्ज

पणजीला ‘ओडीपी’ची गरज नाही : राणे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओडीपीप्रश्‍नी कोणाचाच वाद नाही, असे सांगून या प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तानावडे यांनी हा वाद जाहीरपणे तरी वाढणार नाही, याची काळजी घेतली. पणजीला ‘ओडीपी’ची गरज नाही, असे मंत्री विश्‍वजीत राणे यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com