Babush Monserrat: बाबूशना गोमेकॉतून मिळाला डिस्‍चार्ज

Babush Monserrat: बाबूश मोन्‍सेरातनीच समर्थकांना चिथावले; धक्कादायक खुलासा
Babush Monserrat
Babush MonserratDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrat: महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांना आज बुधवारी सायंकाळी गोमेकॉतून डिस्‍चार्ज देण्‍यात आला. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. अँजिओप्लास्टी करण्यात आल्यानंतर त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार हे स्पष्ट झाले होते. तरी काल मंगळवारी त्यांना डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले होते.

Babush Monserrat
Mopa Airport: मोपा परिसरात तीन हॉटेल्स; महसूल मात्र नगण्यच

बाबूश मोन्‍सेरात यांच्या दोन समर्थकांना पणजी पोलिसांनी अटक केली असता, त्यांना सोडावे यासाठी बाबूश आपल्या समर्थकांसह पोलिस स्थानकावर चाल करून आले. त्यांनीच आपल्या समर्थकांना चिथावल्‍यामुळे त्‍या जमावाने पोलिसांवर हल्ला केला, अशी साक्ष निवृत्त पोलिस अधीक्षक मोहन नाईक यांनी आज दिली. दरम्‍यान, ही सुनावणी आता २ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्‍यात आली आहे.

विद्यमान महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांची पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांचा सहभाग असलेल्‍या २००८ सालच्‍या पणजी पोलिसस्‍थानक हल्‍ला प्रकरणात पणजीचे तत्‍कालीन पोलिस उपअधीक्षक तथा निवृत्त पोलिस अधीक्षक मोहन नाईक यांची साक्ष झाली.

बाबूश यांच्‍या समर्थकांनी पोलिसांवर हल्‍ला केला. त्‍यांना पांगवण्‍यासाठी अश्रूधुरांच्‍या नळकांड्याही फोडल्‍या. तरीही जमाव आटोक्‍यात येत नसल्‍यामुळे शेवटी त्‍यांच्‍यावर लाठीमार करावा लागला, असे नाईक यांनी आपल्‍या साक्षीत सांगितले. यावेळी नाईक यांनी न्यायालयात काही संशयितांची ओळखही पटविली.

दरम्‍यान, माविन गुदिन्‍हो यांच्‍याविरोधात सुरू असलेली वीजबिल घोटाळा प्रकरणाची सुनावणीही आज झाली. त्‍यात एका साक्षीदाराची साक्ष नोंदविण्‍यात आली. पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे.

Babush Monserrat
Panjim Smart City: ...तर अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत

हल्‍ल्‍यात 45 पोलिस झाले होते जखमी

पणजी पोलिसस्‍थानक हल्लाप्रकरणी मोन्‍सेरात दाम्‍पत्‍यासह अन्‍य ३४ जणांवर आरोपपत्र दाखल केलेले आहे. राजकारण्‍यांविरोधातील खटले हाताळण्‍यासाठी स्‍थापन केलेल्‍या खास न्‍यायालयाचे न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी सुरू आहे.यासंदर्भात आज नाईक यांची सरतपासणी झाली. त्‍यांनी सांगितले, हा हल्‍ला झाला त्‍यावेळी मी पणजी पोलिस स्‍थानकावर उपअधीक्षक म्‍हणून काम करीत होतो.

पणजी पोलिसांनी मोन्‍सेरात यांच्‍या दोन समर्थकांना अटक केली होती. त्‍याचा जाब विचारण्‍यासाठी बाबूश व त्‍यांचा जमाव पोलिस स्‍थानकावर चाल करून आला होता. या जमावाला रोखण्‍यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्‍न केले, पण ते व्‍यर्थ ठरले. बाबूश समर्थकांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात ४५ पोलिस जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com