Goa Miles App: टॅक्सी व्यावसायिकांची धारगळमध्ये धुमश्‍चक्री; दोन्ही गटांमध्ये बाचाबाची

Pravin Arlekar: आपण स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबतच राहणार
Pravin Arlekar: आपण स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबतच राहणार
Goa Taxi Driver Fight Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा माईल्स ॲप आधारित टॅक्सी व्यावसायिक आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यवसाय मिळणार, या आशेवर असलेले पेडण्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिक एकाचवेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या धारगळ येथील निवासस्थानी एकत्र आले.

त्यांच्यात सुरवातीला बाचाबाची आणि नंतर तिचे पर्यवसान हाणामारीत झाले. मात्र, आमदार आर्लेकर यांनी दोन्ही गटांची समजूत काढली.

स्थानिक टॅक्सी व्यावसायिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आर्लेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या गोवा माईल्सच्या टॅक्सी व्यावसायिकांसोबत काही प्रश्‍नांवरून त्यांच्यात वाद झाला. गोवा माईल्सच्या टॅक्सी व्यावसायिकाला स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपण स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबतच राहणार असल्याचे जाहीर केले.

टॅक्सी व्यवसाय कुठल्याही कंपनीचा असो एखादे भाडे मिळाले तर तो दर समान असला पाहिजे; परंतु काही गोवा माईल्सचे टॅक्सी व्यावसायिक कमी दराने भाडे मारत असल्याचा दावा यावेळी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी केला. त्याचवेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही यावर नियंत्रण मिळवता आले नाही. मात्र, आजच्या या घटनेवरून पेडणेकरांविरुद्ध पेडणेकर भांडण करत असल्याचे पूर्ण गोव्यात वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी पाहिले.

Pravin Arlekar: आपण स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबतच राहणार
Goa Taxi: गोव्यात आता ॲप आधारित टॅक्सी सेवा; ‘ईव्ही ड्राईव्ह’ ॲप

‘गोवा माईल्स’मध्ये परप्रांतीय

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आम्हाला टॅक्सी व्यवसाय मिळेल, या आशेपोटी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात टॅक्सी व्यवसाय सुरू केला. या स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या अजूनपर्यंत सरकारने सोडवलेल्या नाहीत. गोवा माईल्सचे टॅक्सी व्यावसायिक बाहेरचे असल्यामुळे आमच्या पोटावर ते पाय ठेवत असल्याचा दावा स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी यावेळी केला.

समान दराने भाडे आकारा!

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी सांगितले की, मी सदैव स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबत असणार आहे. गोवा माईल्स टॅक्सी व्यावसायिक कमी दराने भाडे मारून स्थानिकांवर अन्याय करतात. त्यांनी तसे करू नये. शिवाय सर्व टॅक्सी व्यावसायिकांनी समान दराने भाडी मारावीत.

Pravin Arlekar: आपण स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसोबतच राहणार
Goa Miles App: ...आणि म्हणूनच स्थानिक टॅक्सीचालक करताहेत ‘गोवा माईल्स’ला विरोध

कदंब कर्मचाऱ्याला धरले धारेवर

यावेळी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली. त्यावेळी एक कदंब कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यालाही स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी धारेवर धरले. तू सरकारी नोकर असताना तुझ्या बायकोच्या नावावर टॅक्सी आहे का? तू इथे का आलास? असा जाब टॅक्सी व्यावसायिकांनी त्याला विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com