Goa Taxi: गोव्यात आता ॲप आधारित टॅक्सी सेवा; ‘ईव्ही ड्राईव्ह’ ॲप

Evie Drive Application: गोव्याचा परवाना व बॅच असलेल्या टॅक्सीचालकांना संधी
Evie Drive Application: गोव्याचा परवाना व बॅच असलेल्या टॅक्सीचालकांना संधी
Evie Drive Taxi AppDainik Gomantak
Published on
Updated on

"ईव्ही ड्राईव्ह" ही ॲप आधारित टॅक्सी सेवा देणारी राज्यातील पहिलीच कंपनी मडगावात स्थापन झालेली आहे. ज्यांच्याकडे गोव्याचा परवाना व बॅच असेल अशा टॅक्सी चालकांना सामावून घेत व गरजूवंताना सुद्धा परवडेल असे भाडे आकरण्यान येणार आहे. सध्या ५२ टॅक्सी चालकांना कंपनीने संधी दिली आहे.

राज्यात टॅक्सी व्यवसायाला मोठा वावर असतानाही काही मोजक्याच व्यक्ती या व्यवसायात आपले भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करतात. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतर राज्यांप्रमाणे भरभराटीला आलेली नाही.

त्यामुळे राज्यातील टॅक्सी चालकांनाही पुष्कळ त्रास सोसावे लागतात. त्याला इतर अनेक कारणे असू शकतील. सार्वजनिक वाहतुकीची ही विवंचना सोडविण्यासाठी ही कंपनी पुढे सरसावली आहे, असे संचालक पराग रायकर यांनी सांगितले.

Evie Drive Application: गोव्याचा परवाना व बॅच असलेल्या टॅक्सीचालकांना संधी
E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

हल्लीच या कंपनीचा शुभारंभ मडगावात झाला. शुभारंभाच्या वेळी सिद्धेश लोटलीकर , पुनम लोटलीकर , वैष्णवी रायकर व विवान रायकर हे कंपनीचे संचालक उपस्थित होते.

भाडे शुल्क प्रवाशाला परवडेल असे असेल. शिवाय प्रवासाला सुरवात करण्यापुर्वीच प्रवाशाला शुल्क किती हे कळू शकेल. ही सेवा स्थानिक, पर्यटक, औद्योगीक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यासाठी उपयुक्त व सुलभ अशी आहे. मात्र ज्यांना या सेवेची संकल्पना अजून पूर्णपणे समजलेली नाही असे लोकच त्याला विरोध करतात, असे संचालक सिद्धेश लोटलीकर यांनी सांगितले.

Evie Drive Application: गोव्याचा परवाना व बॅच असलेल्या टॅक्सीचालकांना संधी
Goa Taxi: वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारचा महत्वाचा निर्णय, रेंट कॅबला स्पीड गव्हर्नर बंधनकारक

कंपनीची वैशिष्टे आणि सेवा

कंपनीने सुरवातील केवळ चार चाकी टॅक्सीवर जास्त भर दिला असून एक हजार अर्जातून ५२ टॅक्सी चालकांना संधी देण्यात आली आहे. भविष्यात कंपनी रिक्षा, दुचाकी वगैरेसाठी गुंतवणूक करणार आहे, असे रायकर यांनी सांगितले.

कंपनीच्या टॅक्सी रेल्वे स्थानक, विमानतळ, बस स्थानक, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध असतील. एकदा का एप वरून संपर्क साधला की अवघ्याच क्षणात टॅक्सी उपलब्ध होऊ शकेल.

हा ॲप एसओएस पद्धती नुसार गोव्याच्या जेनोरा कंपनीच्या मिलिंद प्रभू व साईश नेवगी यांनी तयार करून या ॲपद्वारे जगातील कुठूनही संपर्क साधण्याची व्यवस्था असली तरी सध्या केवळ गोव्यापुरता हा ॲप मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या ॲपची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ ट्रॅकिंग करण्याची सोपी पद्धत, कुणीही वापरू शकणारा, चालक व प्रवाशांसाठी व्हिडिओ उपलब्ध, त्याच प्रवाशाच्या कुठल्याही कुटुंबीयाने किंवा मित्राने वापरण्याजोगा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com