Arambol: हरमलमध्‍ये ‘बाद’ मतांनी केला भाजप-मगो युतीचा घात! 145 मते अवैध; अवघ्‍या ५४ मतांनी अपक्ष उमेदवाराची सरशी

Arambol ZP Election: सुमारे १० मते पूर्णपणे कोरी असल्याची माहिती पुढे आली आहे. या मोठ्या प्रमाणातील बाद मतांमुळेच भाजप-मगो युतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे.
Arambol
ArambolDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, पराभूत उमेदवार नेमके कुठे कमी पडले याबाबत समर्थकांमध्ये कारणमीमांसा सुरू झाली आहे. हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप-मगो युतीच्या उमेदवार मनीषा कोरकणकर यांचा केवळ ५४ मतांनी पराभव झाला. त्‍यांना ४७३० तर विजयी अपक्ष उमेदवार राधिका पालयेकर यांना ४७८४ मते मिळाली.

या निकालाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १४५ मते बाद ठरली. या बाद मतांबाबत माहिती घेतली असता ‘कमळ’ चिन्हाच्या आजूबाजूला किंवा चौकटीबाहेर शिक्का मारणे, तसेच चुकीच्या पद्धतीने मतपत्रिकेची पुन्हा घडी केल्यामुळे किमान ७० मते बाद ठरली. शिवाय सुमारे १० मते पूर्णपणे कोरी असल्याची माहिती पुढे आली आहे. या मोठ्या प्रमाणातील बाद मतांमुळेच भाजप-मगो युतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे.

हरमल मतदारसंघात हरमल, पालये आणि केरी-तेरेखोल या तीन पंचायतींचा समावेश असून त्या मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या कार्यक्षेत्रात येतात. तर, कोरगाव पंचायत ही पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. या सर्व भागांचा मिळून हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघ तयार झाला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप-मगो युतीच्या उमेदवार मनीषा कोरकणकर यांनी सांगितले की, युतीतील दोन्ही आमदार, नेते व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले होते. भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे आणि मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार, कोपरा सभा आणि जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरमल व कोरगाव येथे दोन जाहीर सभा घेतल्या, तर खासदार सदानंद तानावडे यांनी दोन बैठकींत मार्गदर्शन केले होते.

Arambol
Goa ZP Election Result: भाजपने गतवेळच्या 7 जागा गमावल्या, काँग्रेसने नवे 6 मतदारसंघ जिंकले; भाजपच्‍या काही मंत्र्यांना झटका

या अपयशामुळे भाजप-मगो युतीला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. मांद्रेतील तीन पंचायत क्षेत्रांत या युतीला ३३७२ मते तर कोरगाव पंचायत क्षेत्रात १०९९ मते मिळाली. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार राधिका पालयेकर यांना मांद्रेतील क्षेत्रातून २४८६ मते तर कोरगाव क्षेत्रातून २२३४ मते मिळाली.

Arambol
Goa ZP Election: भाजपची मते वाढली,जागा घटल्या; काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ; काय झाले नेमके? वाचा निवडणुकीचे Report Card

बाद मतांमुळे निकाल फिरला?

चौकटीबाहेर किंवा चुकीचा शिक्का : सुमारे ७० मते

पूर्णपणे कोरी मतपत्रिका : सुमारे १० मते

एकूण बाद मते : १४५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com