Goa Agriculture: निर्धार! कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवेतील शेतकऱ्यांचा पुढाकार; 50 हजार चौ.मी. जमीन आणणार लागवडीखाली

Goa, Nuvem Farmers Initiative: राज्‍यात कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवे येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत. त्यांनी जवळजवळ ५० हजार चौरस मीटर पडीक शेतजमीन लागवडीखाली आणण्याचा निर्धार केला आहे.
Goa Agriculture: निर्धार! कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवेतील शेतकऱ्यांचा पुढाकार; 50 हजार चौ.मी. जमीन आणणार लागवडीखाली
barren landDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: राज्‍यात कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवे येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत. त्यांनी जवळजवळ ५० हजार चौरस मीटर पडीक शेतजमीन लागवडीखाली आणण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्‍हणजे अनेक आव्हानांना तोंड देत त्‍यांनी ही उपलब्‍ध साधली आहे.

गेल्या २५ वर्षांपासून ही शेतजमीन पडीक व दुर्लक्षित होती. स्‍थानिक कृषी खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांच्या मदतीने लागवडीचा उपक्रम हे शेतकरी पुढे नेत आहेत. कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही त्‍यासाठी पुढे सरसावलो, असे नुवे एसटी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मान्‍यूएल बोर्जिस यांनी सांगितले.

Goa Agriculture: निर्धार! कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवेतील शेतकऱ्यांचा पुढाकार; 50 हजार चौ.मी. जमीन आणणार लागवडीखाली
Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

आमचा हा प्रयत्न सरकारी कृषी खात्याच्‍या योजनांचा लाभ घेतच पूर्ण करायचा आहे. ही शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी आम्ही गेल्या वर्षापासून प्रयत्न करत होतो, असे एवर्सन वालीस यांनी सांगितले. सुरवातीला आम्ही लहान प्रमाणात हा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला व आता आम्ही मोठा प्रयत्न करत आहोत असेही त्‍यांनी सांगितले. शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम पाण्याची व्यवस्था करावी लागली असे ते म्‍हणाले.

‘भोगती तळी’ प्रदूषित; शेतीसाठी पाणी मिळेना, शेतकऱ्यांची वणवण

नुवे (Nuvem) येथील ‘भोगती तळी’ हा शेतीसाठी पाण्याचा मोठा स्रोत आहे. मात्र ही तळी प्रदूषित झाल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असे शेतकरी सातू क्लेमेंत यांनी सांगितले

गेल्या कित्येक वर्षांपासून ही तळी प्रदूषित झाल्याने रब्‍बी शेतीची लागवड करणे शक्य होत नाही. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल व सुदिन ढवळीकर यांनी ही तळी दुरुस्त व स्वच्छ करून देण्याचे आश्‍‍वासन दिले होते. नंतर त्यांची खाती गेली व हे काम तसेच राहिले.

या तळीबाबत अलीकडेच विद्यमान पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा (Alex Sequeira) यांच्या कानावर गोष्‍ट घातली आहे. परंतु आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही असे सांगून त्यांनी सारवासारव चालवली आहे.

Goa Agriculture: निर्धार! कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवेतील शेतकऱ्यांचा पुढाकार; 50 हजार चौ.मी. जमीन आणणार लागवडीखाली
Goa Agriculture: गोव्यात मिरी लागवड क्षेत्रात वाढ! 350 टन उत्पादन; 868 हेक्टर क्षेत्रफळात लागवड

सर्वप्रथम आम्ही येथील शेतकऱ्यांना विश्‍‍वासात घेऊन त्यांना शेती लागवडीचे महत्त्‍व पटवून दिले. आम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. सध्‍या आम्ही ५० हजार चौरस मीटर शेतजमिनीवर लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर दीड हेक्‍टर जमीन लागवडीखाली आणण्याचे आमचे ध्‍येय‍ असेल.

मान्‍यूएल बोर्जिस, अध्यक्ष-नुवे एसटी शेतकरी संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com