Arambol: हरमल-भटवाडीत आंदोलन पेटले! ‘झोन’ बदलाचा वाद ऐरणीवर, जमीन विक्री थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांचे निवेदन

Arambol Bhatwadi Land Issue: हरमल-भटवाडीतील सर्वे क्रमांक २४२/० व २४२/१ मधील तब्बल तीन लाख चौरस मीटर डोंगर भागातील जमीन विकत घेऊन झोनिंग बदलण्यात आल्याने परिसरात मोठे आंदोलन पेटले आहे.
Arambol Bhatwadi villagers
Arambol Bhatwadi villagersDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: पेडणे तालुक्यातील डोंगर-माळरान, भरड शेती आणि शेतजमिनी बिगर गोमंतकीयांकडून मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जात असून, त्यानंतर सरकारी पातळीवर झोन बदलून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

हरमल-भटवाडीतील सर्वे क्रमांक २४२/० व २४२/१ मधील तब्बल तीन लाख चौरस मीटर डोंगर भागातील जमीन विकत घेऊन झोनिंग बदलण्यात आल्याने परिसरात मोठे आंदोलन पेटले आहे. येथील भूखंड विक्री थांबवावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

या संदर्भात जागृत नागरिकांनी विविध मार्गांनी आंदोलन छेडत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. या भेटीत ग्रामस्थांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि संबंधित झोन रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Arambol Bhatwadi villagers
Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

स्थानिकांच्या तक्रारीनंतर आमदार जीत आरोलकर हे मागील वर्षभर या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करत असून, त्यांनीच मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे ही बाब मांडल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी पेडणे तालुक्यातील बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या सर्व जमिनींचे झोन मूळ स्थितीत आणावेत, अशी मागणी केली आहे.

Arambol Bhatwadi villagers
Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

डोंगराचे संवर्धन आवश्‍यक

भटवाडी-हरमल परिसरातील डोंगर-माळरान हा महत्त्वाचा जलस्रोत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मोरजी पंचायत हद्दीत ३५ हून अधिक बोरवेल असून, जंगल आणि डोंगर पाण्याचा मुख्य स्त्रोत आहेत. या नैसर्गिक संपत्तीचे जतन न झाल्यास भविष्यात गंभीर पर्यावरणीय हानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. हरमल भागात पर्यटकांची वाढलेली संख्या आणि मुबलक पाणीसाठा लक्षात घेता डोंगराचे संवर्धन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Enemy Property Case Goa
Karapur One Goa Project Protest
House Of Abhinandan Mega project Goa
Goa Land Grabbing Special Court
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com