Aires Rodrigues: गोव्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिग्ज यांना म्हापसा न्यायालयाने माजी मंत्र्यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणात महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. सोशल मीडियावरून संबंधित महिलेची बदनामी केल्याचा आरोप अॅड. रॉड्रिग्ज यांच्यावर होता. न्यायालयाने त्यांना 2 वर्षे आणि 3 महिन्यांचा तुरूंगवास आणि 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यासाठी रॉड्रिग्ज सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती आणि तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती. आता रॉड्रिग्ज यांनी या या शिक्षेला उत्तर गोवा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. यावेळी अॅड. रॉड्रिग्ज म्हणाले की, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललो आहोत, आम्हाला न्याय मिळेल, यावर आमचा विश्वास आहे. कोणताही अन्याय रोखण्यासाठी न्यायपालिका भक्कम आहे.
दरम्यान, रॉड्रिग्ज यांनी संबंधित महिलेचे विविध फोटोज व्हॉट्सअॅप, फेसबूकवरून शेअर केले होते. ते फोटोग्राफ्स व्हायरल झाले होते. अंजुना पोलिसांत याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2018 मध्ये रॉड्रिग्ज यांची चौकशी झाली. न्यायालयाने या प्रकरणात 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विविध कलमांखाली मिळून रॉड्रिग्ज यांना न्यायालयाने एकुण 2 वर्षे 3 महिने तुरूंगवास आणि 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी म्हापसा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री विनोद पालीनकर यांच्या बाबतचे हे कथित सेक्स स्कँडल प्रकरण आहे. विशेष म्हणजे, यात विनोद पालिनेकर यांचा जबाब घेतलेला नाही. किंवा त्यांचा या खटल्यात साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आला नाही, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.