Mahadayi Water Dispute : 'म्हादई बचाव' सभेचं ठिकाण बदललं; आता 'या' गावात होणार सभा

आयोजकांचा निर्णय, साखळीतील विरोधानंतर सरकारला थेट आव्हान
Mahadayi Water Dispute In Goa
Mahadayi Water Dispute In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळीतील नियोजित 'म्हादई बचाव' सभा आता साखळीऐवजी पालिका क्षेत्रातील विर्डी गावात होणार आहे. तसा निर्णय सभा आयोजकांनी घेतला आहे. ही सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या सोमवारीच (ता.16 जानेवारी) सायंकाळी 4 वा. विर्डी-आमोणे पुलाजवळ विर्डी गावात घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या सभेचे स्थळ बदलल्याने आयोजकांना सभेसाठी नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. तशी प्रक्रियाही सुरु झाली आहे. सभा साखळी पालिका क्षेत्रात घेण्याचे निश्चित झाल्याने, आता सरकारची भूमिका कोणती असेल, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Chalo Sankhali | Mahadayi Water Dispute
Chalo Sankhali | Mahadayi Water DisputeDainik Gomantak

सभा विर्डी गावात
ही सभा साखळी बाजारातील पालिका मैदानावर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी साखळी पालिकेने परवानगीही दिली होती. मात्र आठवडी बाजाराचे कारण देत पालिका मुख्याधिकाऱ्यांनी सभेची परवानगी मागे घेतली होती. त्यामुळे राज्यभर प्रचंड खळबळ माजून या कृतीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. पालिकेने साखळीतील सभेची मागे घेतली असली, तरी ही सभा होणारच, असा वज्रनिर्धार आयोजकांनी केला आहे.

Mahadayi Water Dispute In Goa
Accident : कारचालक महिलेची दुचाकीला धडक; पणजीत अपघात

गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी ceo कबीर शिरगांवकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. "तुम्ही जनतेचे सेवक आहेत. तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी जनतेसोबत राहणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही ‘म्हादई बचाव’ सभेला देण्यात आलेली परवानगी मागे घेतल्याचा आदेश काढलात. आम्ही तुम्हाला इशारा देतो कि तुमच्या या निर्णयांना आम्ही घाबरणार नसून सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार" असल्याचे दुर्गादास कामत यांनी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com