Goa Drugs Case: ड्रग्ज तस्करीत महिलांचाही सहभाग; मुंबईच्या वृद्धेला पणजीत बेड्या

824.7 ग्रॅम गांजासह रंगेहाथ पकडले
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case: गोव्यात अवैधरित्या अमली पदार्थांची तस्करीचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात, आणि त्यात मुख्यत्वेकरून तरूणांचा सहभाग असल्याचे दिसून येते. तथापि, गुरूवारी गोव्याची राजधानी पणजीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी पोलिसांनी अमली पदार्थांसह चक्क 71 वर्षीय महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून सुमारे 80 हजार रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Goa Crime
Vasco: ‘वास्को ठरणार पहिले बॅनरमुक्त शहर’

पणजी पोलिसातील पोलिस उपनिरीक्षक संकेत पोखरे, पोलिस कॉन्स्टेबल एर्मिया बालबद्रा, परशुराम पिळणकर, नूतन गौणसांड, विकास नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला अमली पदार्थांबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने पणजीतील काम्पाल या भागात गुरूवारी दुपारी साडे तीन ते पाच या वेळेत धाड टाकली.

Goa Crime
Mahadayi Water Dispute: "ठिकाण लक्षात ठेवा! सभा साखळीतच होणार, मुख्यमंत्र्यांमध्ये दम असेल तर..."

यावेळी मालन दगडू काळे (वय 71, रा. राम मंदिराजवळ, बेली, बार्देश, गोवा) या महिलेला पोलिसांनी गांजासह रंगेहाथ ताब्यात घेतले. ती मूळची इलालुभाई कम्पाऊंड बिल्डिंग नंबर 13, रूम नंबर 503, अन्नामलाई सहकारी हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर, मुंबई येथील आहे. तिच्याकडून 824.7 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण किंमत सुमारे 80 हजार रूपये होते. या महिलेविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com