Goa Taxi Driver: ‘ॲप’धारक टॅक्सीचालकांना हॉटेलबाहेर पार्किंग नको! स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

Goa Taxi Operator: ‘ॲप’धारित चालकांकडून हॉटेल्समधील भाडे घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिकावर अन्याय होत असल्याचा आरोप
Goa Taxi Operator Protest: ‘ॲप’धारित चालकांकडून हॉटेल्समधील भाडे घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिकावर अन्याय होत असल्याचा आरोप
Goa Taxi Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फातोर्डा: ‘ॲप’धारित टॅक्सी चालकांकडून हॉटेल्समधील भाडे घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे, त्यामुळे स्थानिकावर अन्याय होत आहे. त्यांना निश्‍चित जागा ठरवून द्यावी, हॉटेलबाहेर पार्किंग नको, या मागण्याची पूर्तता शासनाने न केल्यास राज्यव्यापी टॅक्सी बंद पुकारण्यात येईल, असा इशारा रविवारी स्थानिक टॅक्‍सी चालकांनी दिला.

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांच्यासह स्थानिक टॅक्सीचालकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला टॅक्सी स्टँड व हॉटेल्सवरील व्यवसाय बुडत असल्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. वाझ म्हणाले, पराग रायकर यांनी पोलिस तक्रार केली त्याची काळजी नाही. आपण त्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही.

स्थानिक टॅक्सीचालकांचे व्यवसाय राखण्यासाठी काम करत आहोत. सरपंच म्हणून गावातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॅक्स यांचे व्यवसाय राखण्याची व गावात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आहे.

पराग रायकर यांच्यासह सोबतच्या टॅक्सीचालकांकडून कोणत्याही गाडीला कुठूनही भाडे मारण्याची परवानगी परवान्याद्वारे दिल्याचे सांगण्यात येते. पण ते आमचा व्यवसाय काढून घेत आहेत.

सरपंच डिक्सन वाझ यांच्याविरोधात तक्रार झालेली असली तरी टॅक्सीचालक त्यांच्या पाठीशी राहणार. गरज पडल्यास गोवा बंद करण्याची तयारीही आहे. कोणत्याही गाडीला हॉटेल्सच्या गेटसमोर गाडी लावण्यास बंदी असतानाही गोवा माईल्सवाले गाड्या ठेवण्यात येतात. हे बंद होण्याची गरज आहे. हॉटेल्सवाल्यांनाही निवेदन सादर केली जातील, असे बाणावलीतील टॅक्सीचालकांनी केले.

टॅक्सीचालक जेम्स म्हणाले, बाणावलीतील हॉटेल्सचा फायदा गावातील लोकांना होण्याची गरज आहे. त्यासाठीच गावातील जमिनी हॉटेल्ससाठी देण्यात आलेल्या आहेत.

Goa Taxi Operator Protest: ‘ॲप’धारित चालकांकडून हॉटेल्समधील भाडे घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिकावर अन्याय होत असल्याचा आरोप
Goa Taxi Driver Protest: ॲपचा विषय मागेच पडला! पेडणे तालुका समितीचा टॅक्सी व्यावसायिकांसाठी होता प्रस्ताव

स्थानिक गाड्यांचा वापर करा

किनारी भागातील हॉटेल्सना गावातील लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत, याची जाणीव ठेवत हॉटेल्स व्यवस्थापनाकडूनही स्टँडवरील टॅक्सीचालकांकडून गाड्या घेत पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्यांनी स्टँडवरील गाड्याऐवजी बाहेरील गाड्यांची नेमणूक लग्न समारंभ, कॉन्फरन्स व इतर कार्यक्रमांसाठी करु नये, अशी मागणी डिक्सन वाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa protests in last five years
Karapur One Goa Project Protest
Goa Taxi Fare Latest Update
Gen Z Movement India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com