धर्मांतरविरोधी विधेयक म्हणजे फुटीचे षड्‌यंत्र, सरकारकडे आकडेवारीच नाही; विरियातो फर्नांडिस यांचा आरोप

Goa Anti Conversion Bill: विधानसभा अधिवेशनात धर्मांतरविरोधी विधेयक मांडण्याचा सरकारी पक्षाचा डाव आहे.
Goa Anti Conversion Bill
Goa Anti Conversion Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: विधानसभा अधिवेशनात धर्मांतरविरोधी विधेयक मांडण्याचा सरकारी पक्षाचा डाव आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे गोव्यातील हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती समाजामध्ये फूट पाडण्याचे हे षड्‌यंत्र आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.

फर्नांडिस म्हणाले की, दशकानुदशके गोव्यात सर्व समाज एकत्र राहतात. कधीही धर्मावरून गोव्यात दंगे, मारामाऱ्या झालेल्या नाहीत. इतर राज्यांतील लोकसुद्धा गोव्याकडे सांप्रदायिक सद्भावनेचे प्रतीक म्हणून पाहतात. अशा वेळी गोव्यात अशा प्रकारचे विधेयक आणण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Goa Anti Conversion Bill
Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची 'बॅटिंग'! बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम; पुढील 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

धर्मांतरासंदर्भात सरकारकडे कोणताही आकडेवारीच ती नाही. यापूर्वी केवळ तीन प्रकरणे प्रकाशात आली होती. त्यातील एक खोटे होते, तर दोन प्रकरणे न्यायालयात रद्दबातल ठरवण्यात आली, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.हे विधेयक विधानसभेत मांडू नये व पक्षपाती राजकारणाविरोधात उभे राहावे, असे आवाहन शेवटी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले.

Goa Anti Conversion Bill
Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची 'बॅटिंग'! बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम; पुढील 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

दरम्यान, ज्या अर्थी शिक्षण खात्याने अशा प्रकारचे परिपत्रक काढले आहे, त्यावरून शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांचा व्यवहार सुरू आहे, हे मान्य असल्याचा अर्थ होतो, असेही खासदारांचे म्हणणे आहे.

Goa Anti Conversion Bill
Goa Crime: दोन्ही भाडोत्री मारेकरी अजून फरार; नायक गोळीबारप्रकरणी 24 तासांनंतरही धागेदोरे सापडेनात

...हे शिक्षण खात्याचे काम नव्हे !

अमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाविरोधात कारवाई करणे हे गृह खाते किंवा सुरक्षा यंत्रणांचे काम आहे, शिक्षण खात्याचे नव्हे. शिक्षण खात्याने सर्व शैक्षणिक संस्थांना ५०० मीटर परिसरात अंमली पदार्थांचा व्यवहार होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे परिपत्रक पाठवणे चुकीचे आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com