Goa Question Paper Scam:डिचोलीत प्रश्नपत्रिका अन् उत्तरप्रत्रिकांचा घोळ, गोवा बोर्डाचीच चूक; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची कबुली

Urdu Question Paper Scam: इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका जोडल्याने एकच खळबळ उडाली
Urdu Question Paper Scam: इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका जोडल्याने एकच खळबळ उडाली
Urdu Question Paper Scam GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Urdu Question Paper Scam Bicholim,Goa

डिचोली: राज्यातील विविध शाळांमध्ये सध्या पहिली सत्र परीक्षा सुरु आहेत, जवळपास 17 ऑक्टोबरपासूनच राज्यातील शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षांना सुरुवात झाली आहे. आज गुरुवार (दि. 24 ऑक्टोबर) रोजी राज्यातील शाळांमध्ये मराठी आणि उर्दू भाषेची परीक्षा होती. गोवा बोर्डकडून परीक्षेसाठी या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात मात्र आज डिचोलीत उर्दू प्रश्नपत्रिकेबाबत एक गंभीर घटना घडली.

डिचोली तालुक्यातील दोन शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवली जाते, पैकी एका सरकारी तर दुसरी खासगी शाळा आहे. आज (दि. २४ ऑक्टोबर) रोजी सकाळी परीक्षेत वितरित करण्यासाठी आलेल्या प्रश्नपत्रिकांसोबत उत्तरपत्रिका देखील असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले.

Urdu Question Paper Scam: इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका जोडल्याने एकच खळबळ उडाली
55th Iffi Festival In Goa: इफ्फीत ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” नामांकन; सिनेरसिकांना होणार ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक योगदानाची ओळख!

इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका जोडल्याने एकच खळबळ उडाली, मात्र शाळेतील शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रश्नपत्रिकेसोबत जोडलेल्या उत्तर पत्रिका वेगळ्या केल्या.

उर्दू प्रश्नपत्रिका घोळ, गोवा बोर्डचीच चूक : अध्यक्ष भगिरथ शेट्ये

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका पोहोचण्याची चूक ही गोवा बोर्डची आहे अशी कबुली दिली. या संदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com