30 दिवसांच्या आत शेतजमीन पूर्ववत करा, 15 लाखांचा दंड भरा; गोव्यातील वादग्रस्त नाईट क्लबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Anjuna Goya Night Club: शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी हणजूण येथील वादग्रस्त ‘गोंया’ नाईट क्लबला बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
Anjuna Goya Night Club
Anjuna Goya Night ClubDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी हणजूण येथील वादग्रस्त ‘गोंया’ नाईट क्लबला बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ती जमीन पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचे आदेश क्लब व्यवस्थापनाला दिले आहेत.

हा बेकायदा नाईट क्लब सुमारे अडीच हजार चौरस मीटर क्षेत्रफळ शेतजमिनीत उभारण्यात आला आहे. दरम्यान, या आदेशाला प्रशासकीय लवादाकडे आव्हान देण्यात आले आहे. तपासणीत ‘गोंया’ क्लब हा मूळ शेतजमिनीत बेकायदेशीर उभारल्याचे आढळून आले.

Anjuna Goya Night Club
Goa Nightclub Fire: ‘बर्च’ प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार! खंडपीठाचे स्पष्टीकरण; गोव्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे दिले संकेत

अग्निसुरक्षा परवानासुद्धा नसल्याने तत्काळ तो सील करण्यात आला. बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आदेश देत क्लब व्यवस्थापनाला आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत जमीन पुन्हा तिच्या मूळ शेतीयोग्य स्थितीत आणण्याचे निर्देश दिले आहेत.

Anjuna Goya Night Club
Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

शिवाय शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याबद्दल १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. हा आदेश १६ डिसेंबर २०२५ रोजी खुल्या न्यायालयात सुनावण्यात आला. दरम्यान, दिलेल्या मुदतीत जमीन मूळ स्‍थितीत न आणल्‍यास मामलेदार आदेश अमलात आणतील आणि त्यासाठी येणारा खर्च क्‍लबकडून वसूल केला जाईल, असेही आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com