Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Margao Abduction Case 2024: रायकर हे सोन्‍याचे व्‍यापारी असून त्‍यामुळे हा प्रयत्‍न नेमका कशामुळे झाला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे.
Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी
Margao Abduction Case 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आके येथून बुधवारी सकाळी तीन अज्ञात व्यक्तींनी मडगाव येथील रहिवासी कुणाल रायकर यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या अशी घटना घडल्‍याने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे.

रायकर हे सोन्‍याचे व्‍यापारी असून त्‍यामुळे हा प्रयत्‍न नेमका कशामुळे झाला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. आज (23 ऑक्टोबर) सकाळी 7.45 वाजता मुलाला शाळेत सोडण्यासाठी रायकर आके येथे आले होते. आपल्‍या मुलाला शाळेत सोडून ते परत गाडीकडे आले असता, तीन अज्ञात संशयितांनी त्‍यांना अडवले असे प्रत्यक्षदर्शिनी मडगाव पोलिसांना सांगितले.

अपहरणाचा डाव

दरम्यान, आरोपींनी (Accused) रायकर यांचे त्यांच्या कारमधून अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. या गडबडीत त्‍या आरोपीच्‍या हातात असलेल्‍या बंदुकीतील गोळ्‍यांची मॅगझिन सुटून खाली पडली. मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी सध्या तपास सुरु आहे.

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी
Goa Crime: गोव्यात 'बंटी-बबली'चा धुमाकूळ, बनावट कागदपत्रांद्वारे घातला गंडा, महिनाभरानंतर ऐवढ्या किंमतीचे सोने जप्त

कायद्याचा धाक राहिला नाही: युरी आलेमाव

या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao) म्हणाले की, राज्यात कायद्याचा धाक कमी होत चालला आहे. आलेमाव यांनी त्यांच्या एक्‍स हँडलवर लिहिले की, “आके-मडगाव येथे दिवसाढवळ्या लोकांना बंदुकीच्या धाकाने धमकावण्याच्या घटनेने गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com