'या' तीन आमदारांसाठी अमित शाह उद्या गोव्यात

यावेळी स्वबळावर भाजपाचे गोव्यात सरकार येणार असल्याचा विश्‍वास यावेळी तानावडे यांनी व्यक्त केला
Amit Shah
Amit ShahDainik gomantak
Published on
Updated on

पणजी : भारताचे गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा हे उद्या दिनांक 30 जानेवारी रोजी गोव्यात येत असून ते दोन जाहीर सभासह एकूण तीन ठिकाणी प्रचारात सहभागी होतील. त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण विविध माध्यमातून केले जाणार आहे. आज पणजी येथील भाजपाच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते .

यावेळी बोलताना तानावडे म्हणाले की 11 जानेवारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, तसेच केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी व इतर नेत्यांच्या सभा गोव्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार आहेत.

Amit Shah
टीएमसीचा जाहीरनामा जनतेसमोर, गोव्यातील तरुणांसह महिलांना मिळणार लाभ

उद्या दिनांक 30 रोजी अमित शहा हे गोव्यात (goa) येत असून संध्याकाळी 4.30 वा. शिरोड व फोंडा मतदार संघातील उमेदवारासाठी हॉटेल सनग्रेस गार्डनमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे. कोरोनामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांना तेथे बोलावण्यात आले असून अमित शहा (Amit Shah) यांच्या सर्व सभा राज्यातील विविध भागात स्क्रीन उभारून, सभागृहांमध्ये आणि खुल्या जागेतस्क्रीन द्वारे त्याचे थेट प्रक्षेपण केले जातील. फेसबुकवर व व्रुतवाहिनीवर या सभा थेट दाखवल्या जातील. अशी माहिती तानावडे यांनी दिली.

दुसरी सभा शारदा इंग्लिश हायस्कूल सावर्डे येथे सावर्डे मतदारसंघाचे भाजप उमेदवार गणेश गावकर यांच्या प्रचारार्थ होणार असून ती 5.20 वा . होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता वास्को येथे अम्ब्रेला कॅम्पेनचे उद्घाटन होणार आहे. यामुळे राज्यभरातील सर्व मतदारसंघात प्रचार प्रचाराला सुरुवात होणार आहे . रेल्वे सभागृहात आयोजित या कार्यक्रमांमध्ये अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एकूण तीन सभांमध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेतले जाईल. कोरोना नियमाचे पालन करून या सभा होणार आहेत.

Amit Shah
60 वर्षांवरील नागरिकांसह 'या' कर्मचार्‍यांना उद्या पणजीत मिळणार बूस्टर डोस

अशी माहिती देऊन त्या सर्व सभांचे थेट प्रक्षेपण फेसबुक तसेच त वृत्तवाहिन्या आणि स्क्रीन उभारून केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ भाजप कार्यकर्त्यांसह राज्यातील मतदारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी तानावडे यांनी केले. राज्यभरात भाजपाचा प्रचार जोरात सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी स्वबळावर भाजपाचे गोव्यात सरकार येणार असल्याचा विश्‍वास यावेळी तानावडे यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com