अमित पालेकर (Amit Palekar) यांनी जुने गोवे (Old Goa) वारसास्थळी असलेल्या बेकायदा बांधकामाला विरोध करण्यासाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार जोपर्यंत हा प्रकल्प रद्द करून बांधण्यात आलेला प्रकल्प जमीनदोस्त करण्यासाठी ठोस निर्णय आणि देण्यात आलेले बांधकाम परवाने रद्द केल्याचे जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ते जुने गोवे कॅजेटन चर्च परिसरात उपोषण सुरू करणार आहेत. (Amit Palekar warns government for strike for old goa)
वारसास्थळी बेकायदा बांधकाम सुरू झाल्यापासून मंत्री आणि आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्र्यासह सर्वजण वेगवेगळी विधाने करत आहेत ही राजकारण्यांनी चालवलेली थट्टा असल्याचा संताप पालेकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री सावंत (Pramod Swanat) यांनी या बांधकामाला विजय सरदेसाई (Vijai Sardesai) आणि त्यांच्या सचिवांनी परवानगी दिली असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप केला होता . तसेच या बेकायदा बांधकामाची कोणती तक्रार आली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते . मात्र, सरकार म्हणून अशा बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे राज्य सरकारकडे पूर्ण अधिकार असतात त्यादृष्टीने सरकारने कोणतेही पाऊल उचलल्याचे निदर्शनास आले नाही, असे पालेकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान जुन्या गोव्यातील सेंट कॅजेटन चर्चजवळील वादग्रस्त बांधकामाबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शहर आणि नगर नियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर यांना पत्र लिहिले असून या बांधकामाला दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची मागणी केली आहे.या बांधकामाला दिलेल्या परवानग्या रद्द करण्यापासून तुम्हाला कोण अडवत आहे. त्यांनी परवानगी का दिली असा प्रश्न त्यांनी मंत्र्यांना केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.