Amit Palekar: आज ना उद्या सत्य बाहेर येईलच! बाणास्तरी ते सुलेमान व्हिडिओप्रकरणी पालेकर रोखठोक बोलले

Banastarim Accident Case: ॲड. पालेकर यांनी या मुलाखतीत बाणास्तरी अपघातापासून ते सध्याच्या गाजत असलेल्या सुलेमान खानच्या व्हिडिओप्रकरणी पोलिसांकडून हजर राहण्यास बजावलेल्या नोटिशीपर्यंत अनेक विषयांवर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
Amit Palekar Inquiry
Amit Palekar InquiryX
Published on
Updated on

Amit Palekar About Banastarim Accident Suleman Khan

पणजी: बाणस्तरी पुलावरील अपघातप्रकरणी आपल्याविरुद्ध खोटा चालक दाखविल्याचा गुन्हा सरकारने कटकारस्थान रचून नोंदविला. त्याशिवाय मुलीशी दिवसभर वेळ घालविण्याचे ठरविलेले असताना आपणास विनंती करूनही पोलिसांनी ज्याप्रकारे ताब्यात घेतले, तेही अत्यंत चुकीचे होते. आपल्या अटकेचा प्रसंग माझ्या मुलीच्या मनात कायमस्वरूपी उरणार आहे, अशी खदखद आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी एका खासगी यूट्यूब वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.

ॲड. पालेकर यांनी या मुलाखतीत बाणास्तरी अपघातापासून ते सध्याच्या गाजत असलेल्या सिद्दीकी सुलेमान खानच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पोलिसांकडून हजर राहण्यास बजावलेल्या नोटिशीपर्यंत अनेक विषयांवर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. परंतु या मुलाखतीत त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढीत असल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुनील कवठणकर यांचा उल्लेख केला आहे.

बाणस्तरीच्या घटनेविषयी ते म्हणतात, पार्टीतून आपण घरी आलो, अपघात झाल्यानंतर काही वेळाने आपणास फोन आला. रोटरीयन म्हणून मदत करीत होतो. मूळ गाडीचालक तथा मालकाने आपण पोलिसांत सरेंडर होण्यास तयार असल्याचे सांगितले होते,ण आपल्यावर या प्रकरणात खोटा चालक दाखविल्याचा गुन्हा दाखल केला.

Amit Palekar Inquiry
Amit Palekar Inquiry: 'मी पोलीस स्थानकात असताना सुलेमानचा व्हिडीओ कसा व्हायरल होतो'? पालेकरांचे चौकशीवरून आरोप

सत्य बाहेर येणार?

ॲड. पालेकर म्हणतात, सत्याचा विजय आणि वाईटाचा नाश हा ठरलेला आहे. आज ना उद्या सत्य काय? ते बाहेर येईलच. आपण भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सतत बोलत आहे. त्यामुळेच आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. पणजीत हजार कोटींची कामे कुठे झाली?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com