Vasco News: अमेरिकेचं 'व्हायकिंग नेपच्यून' 1285 पर्यटकांसह मुरगाव बंदरात दाखल

सदर पर्यटक जहाज एम. बक्सी यांच्या प्रायोजनाखाली मुरगाव बंदरात दाखल झाले.
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय प्रवासी पर्यटक जहाज 'व्हायकिंग नेपच्यून' आज 31 मार्च 2023 मुरगाव बंदरात 1285 पर्यटकांना घेऊन पोहोचले. सदर जहाज पहाटे 5.45 वाजता ब्रेकवॉटर येथे क्रूझ बर्थवर बंदरात दाखल झाले. पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जहाजावरील पर्यटकांचे जंगी स्वागत केले.

यंदाच्या पर्यटन हंगामातील विदेशी पर्यटक जहाज "व्हायकिंग नेपच्यून" मुरगाव बंदरात सकाळी 816 पर्यटक प्रवासी व 469 कर्मचारी मिळून 1285 देशविदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले.

Vasco News
Goa kala Academy: गोवा कला अकादमी आयोजित 48 व्या तियात्र स्पर्धेत ‘देवान् दिला तें’ प्रथम

सदर जहाज कोचिन मार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले. सदर पर्यटक जहाज एम. बक्सी यांच्या प्रायोजनाखाली मुरगाव बंदरात दाखल झाले. दाखल झाल्यानंतर पर्यटक सर्व सोपस्कर पूर्ण करून गोवा भ्रमंतीसाठी रवाना झाले.

Vasco News
Goa Congress Protest: भाजप सरकारच्या 'त्या' कृतीविरोधात गोवा प्रदेश काँग्रेसचे आंदोलन

गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आश्वाद घेतल्यानंतर पर्यटक पुन्हा मुरगाव बंदरात दाखल होऊन जहाजाने पुढील स्थळाला भेट देण्यास रवाना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार सदर जहाज संध्याकाळी 6 वाजता मुंबईला जायला रवाना झाले. सुमारे 4 नविन प्रवासी प्रवासासाठी - सामील झाले आणि सुमारे 39 प्रवासी गोव्यात उतरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com