Goa Congress : गोवा क्रांतीदिनी भाजप सरकारची बेरंगी वागणूक : अमरनाथ पणजीकर

गोवा क्रांती दिन गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस : पणजीकर
Black & White Invitation Cards & Advertisements
Black & White Invitation Cards & AdvertisementsDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Panjikar : गोवा क्रांती दिन हा गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने या ऐतिहासिक सोहळ्याला बेरंगी केले आहे, हे दुःखद आणि घृणास्पद आहे, असा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

स्वातंत्र्य सैनिक आणि इतरांना पाठवलेल्या ब्लॅक अँड व्हाईट आमंत्रणावर तसेच अवघ्या काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या कृष्णधवल जाहिरातींवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Black & White Invitation Cards & Advertisements
Goa Revolution Day: भावा तुका याद आसा 18 जून? गोवा क्रांतिदिन उद्देश आणि महत्व

पणजीकर म्हणाले की, प्रसिद्धीचे वेड लागलेल्या भाजप सरकारकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या रंगीत फोटोंसह जी20 जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत. पण गोवा क्रांती दिन आणि स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यासाठी रंगीत निमंत्रण पत्रिका व जाहिराती देण्यास त्यांच्याकडे निधी नाही.

अवघ्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कृष्णधवल जाहिरातीमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांचे फोटो नाहीत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे फोटो घालून स्वयं प्रसिद्धी करुन घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे.

गोवा क्रांती दिनाला भाजप सरकार अशी हिन वागणूक देते याची लाज वाटते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Black & White Invitation Cards & Advertisements
Salcete News: राय ग्रामपंचायतीच्‍या साहित्य खरेदीतला तब्बल 'एवढ्या' लाखांचा घोटाळा उघड

भाजप आता हुकूमशहा नरेंद्र मोदी चालवत आहेत. ते सर्वत्र हुकूमशाहीला प्रोत्साहन देत आहेत. गोवा क्रांती दिन हा हुकूमशाही सालाझार राजवटीच्या विरोधात होता म्हणून मुख्यमंत्र्यांना तो ऐतिहासीक दिवसच पुसून टाकायचा आहे का? असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.

ऐतिहासिक कार्यक्रम हे रंगारंग कार्यक्रमांनी साजरे केले पाहिजेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वत:चाच उदो-उदो करण्याच्या धुंदीतून बाहेर पडून इतिहासाची पुस्तके वाचावीत. त्यामुळे त्यांना गोवा क्रांती दिनाची माहिती मिळण्यास मदत होईल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com