Goa Congress : काँग्रेसचे दोन आमदार फुटण्याच्या मार्गावर : ‘आप’चे भाकित

संतोष यांची गोवा भेट
 BJP andCongress
BJP andCongressDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या धावत्या गोवा भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चेला वेग आला असून मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या फुटीर आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दुसरीकडे उरलीसुरली काँग्रेस शिल्लक राहील की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘आप’ने तर आणखी दोन काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे भाकित करून या राजकीय चर्चेला आणखी हवा दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष हे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने व्हाया गोवा कर्नाटककडे जात होते. दाबोळी विमानतळावर त्यांनी विश्रांती घेत काही स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि फोनाफोनी केली. त्यामुळे मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेने वेग घेतला.

 BJP andCongress
Woman Assaulted in Margao: मथुरा दारू तस्करीचा अड्डा

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 8 आमदारांपैकी संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक यांना सत्तेत सामावून घेण्यासाठीची पदे देण्यात आली आहेत.

मात्र, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री मायकल लोबो आणि आलेक्स सिक्वेरा यांना कोणतेही पद दिलेले नाही. त्यामुळे आता त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, अशी चर्चा आहे.

मात्र, सध्या मंत्रिमंडळ ''फुल्ल'' झाले आहे. जर या फुटीर आमदारांना पदे द्यायची झाल्यास सध्याच्या मंत्रिमंडळातील तिघा मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे. त्यामुळे मूळ भाजपमध्ये असंतोष आहे. त्यामुळे यातील एकाला किंवा दोघांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे.

यावर केंद्रीय नेते निर्णय घेतील आणि त्याची अंमलबजावणी होईल. मात्र, सध्या याची घाई नाही, असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघा नेत्यांनाही काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

 BJP andCongress
CM Pramod Sawant Interview: खाण लिलावातूनच भरीव महसूलप्राप्ती : मुख्यमंत्री

‘मेसेज’ आला अन्

सध्या काँग्रेसमधून फुटून आलेल्या 8 आमदारांपैकी 5 आमदारांना ठिकठिकाणी पदे देऊन त्यांचे समाधान केले आहे. मात्र, या ‘जी-8’चे नेतृत्व करणारे दिगंबर कामत, मायकल लोबो आणि आलेक्स सिक्वेरा यांच्या पदरात अद्यापही काहीही पडलेले नाही.

येत्या काही दिवसांत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वर्णी लावण्यात येईल, असा मेसेज दिल्लीतून आला आहे. त्यातच बी. एल. संतोष यांनी गाठीभेटी घेत फोनाफोनी केल्याने या ‘मेसेज’ला नवा आयाम मिळाला आहे.

रविवारपर्यंत गौप्यस्फोट

दुसरीकडे बुधवारी आम आदमी पक्षाचे निमंत्रक अमित पालेकर यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे दोन आमदार येत्या रविवारपर्यंत (ईस्टर संडे) भाजपवासी होतील, असा खळबळजनक दावा केला आहे.

अलीकडच्या काळातील भाजपजवळचे आमदार कोण, हे तुम्हीच तपासा आणि तुम्हीच ठरवा, असेही अमित पालेकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com