Rohit Monserrate- Mayor of Panaji: पणजी महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने रोहित मोन्सेरात यांची महापौरपदी तर उपमहापौरपदासाठी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा आयुक्त क्लेन मदेरा यांनी केली.
रोहित यांनी चौथ्यांदा तर संजीव यांनी तिसऱ्यांदा पदभार स्विकारला आहे. यावेळी बोलताना रोहित मोन्सेरात म्हणाले, आम्ही महापालिकेच्या मालमत्तांचे प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू.
तसेच नॅशनल थिअटरचा, नवीन महानगरपालिका ईमारत प्रकल्प मार्गी लागल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळू शकते.
आम्ही या मालमत्ता विकणार नसून केवळ व्यवसायिक वापरासाठी भाडेतत्वावर देणार आहोत. महापालिका आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली तर आम्हाला घरपट्टी तसेच अन्य कर वाढवावे लागणार नाहीत असे त्यांनी सांगितले.
महानरपालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी गटाच्या 11 नगरसेविका आहेत. परंतु त्यांना महापौरपद किंवा उपमहापौरपद देण्यात आलेले नाही.
एका बाजूला लोकसभेची दक्षिणेत महिला उमेदवार देऊन भाजपकडून 50 टक्के आरक्षण दिल्याचे सांगत असताना त्या 11 पैकी एकही महिला महापौरपदासाठी पात्र नाही का? असा सवाल केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.