कोलवाळध्ये भूखंड लाटण्यासाठी चालबाजी!

नियमबाह्य दुरुस्तीचा आरोप, गोवा गृहनिर्माण मंडळावर रहिवाशांचा रोख
Colvale Land Scam
Colvale Land ScamDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीत आमदार नीळकंठ हळर्णकर मुख्य प्रवर्तक असलेल्या ‘हळर्णकर एज्युकेशन सोसायटी’ला 2125 चौरस मीटर क्षेत्रफळाचा प्लॉट गोवा गृहनिर्माण मंडळाने मूळच्या मास्टर प्लानमध्ये नियमबाह्य पद्धतीने दुरुस्ती करुन उपलब्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे. भूखंड स्वत:च्या पदरात पाडून घेण्यासाठी कुणीतरी अनोखी चालबाजी केल्याचा तेथील रहिवाशांचा दावा असून त्यांचा रोख स्थानिक आमदार आणि गोवा गृहनिर्माण मंडळावर आहे. (Colvale Land Scam News Updates)

Colvale Land Scam
कळंगुट ग्रामपंचायतीची पोलिसांना अवैध बांधकामे थांबवण्याची मागणी

आमदार हळर्णकर हे प्रवर्तक असलेल्या ‘हळर्णकर चेरिटेबल ट्रस्ट’ या अन्य एका शैक्षणिक संस्थेला या पूर्वी तिथे प्लॉट दिला असताना आता त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या अन्य एका संस्थेला आता भूखंड देण्याचे प्रायोजन काय, असा सवाल कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीतील मिनी सेटलाइट टाऊनशिप रेसिडेंट्‍स असोसिएशनचे अध्यक्ष बाबनी साळगावकर यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार हळर्णकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न कित्येकदा केला असता त्यांचा फोन बंदच होता.

नियमभंग करून मूळच्या मास्टर प्लानमध्ये बदल / दुरुस्ती केल्याप्रकरणी असोसिएशने यासंदर्भात गोवा गृहनिर्माण मंडळाच्या विरोधात 4 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयासमोर याचिका सादर केली आहे. या याचिकेत, गोवा (Goa) राज्य गृहनिर्माण खाते, कोलवाळ पंचायत, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, हळर्णकर एज्युकेशन सोसायटी, तरुण भारत, गजानन खोर्जुवेकर व नीळकंठ हळर्णकर यांना प्रतिवादी केलेले आहे.

Colvale Land Scam
आमच्या समस्या सोडवा; गोव्यातील मीठ व्यवसायिकांची सरकारला हाक

वास्तविक, भूखंडवितरणाबाबत गृहनिर्माण मंडळाच्या नियमांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, की ज्या व्यक्तीला अथवा संस्थेला प्लॉट मिळाला आहे, त्यांना आगामी तीस वर्षांपर्यंत अथवा पूर्वीच्या भूखंडवितरणानंततर तीस वर्षांत भूखंड दिलाच जाऊ शकत नाही. त्यामुळे प्लॉट मिळवण्यासाठी आमदार हळर्णकर यांच्या पुढाकाराने ’हळर्णकर एज्युकेशन सोसायटी ही नवीन संस्था स्थापन केल्याचेही उघडकीस आले आहे.

यासंदर्भात रहिवासी संघटनेचे अध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले, की अलीकडेच हळर्णकर एज्युकेशन सोसायटीला गृहनिर्माण मंडळाने शैक्षणिक प्लॉट दिला आहे. तो 2,125 चौरस मीटरचा प्लॉट योग्य तथा पारदर्शक भूखंड वितरण प्रक्रिया न पार पाडता गोवा गृहनिर्माण मंडळाने त्यांना उपलब्ध केलेला आहे. हळर्णकर एज्युकेशन सोसायटीने आता बांधकाम उभारण्याच्या हेतूने याच आठवण्यात तिथे खोदकाम सुरु केले आहे.

Colvale Land Scam
हरमलमध्ये विदेशी पर्यटकांनी दिला शांतीचा संदेश

मूळ मास्टर प्लानमध्ये केली दुरुस्ती

स्थानिक आमदार निळकंठ हळर्णकर (Nilkanth Halarnkar) हे ‘हळर्णकर चेरिटेबल ट्रस्ट’चे तसेच ‘हळर्णकर इज्युकेशनल सोसायटी’ या दोन्ही संस्थांचे प्रवर्तक असून अन्य सर्व प्रवर्तकही समसमानच आहेत. ‘हळर्णकर चेरिटेबल ट्रस्ट’ला या पूर्वी शैक्षणिक कारणांस्तव प्लॉट उपलब्ध करून दिलेला आहे व त्यासाठी दोन प्लॉट एकत्रित करण्यात आले होते. त्या संस्थेला प्लॉट देण्याच्या उद्‍देशाने मूळच्या मास्टर प्लानमध्ये असलेले नियोजित पोस्ट कार्यालयासाठी असलेल्या प्लॉटचे आरक्षण (Reservation) रद्द करण्यात आले होते. त्या वेळी निळकंठ हळर्णकर हे गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com