हरमलमध्ये विदेशी पर्यटकांनी दिला शांतीचा संदेश

दोन चित्ररथांची मिरवणूक : ‘युक्रेन-रशिया नो वॉर’चे झळकले फलक
Goa Carnival Festival News Updates
Goa Carnival Festival News UpdatesDainik Gomantak

हरमल: राज्‍यात शनिवारपासून कार्निव्‍हल महोत्‍सव सुरू होणार असला तरी हरमल किनारी भागात धूम सुरू झालेली आहे. तब्‍बल दोन वर्षांनी विदेशी पर्यटकांनी येथे कार्निव्हल साजरा करून मनमुराद आनंद लुटला. मिरवणुकीत दोन चित्ररथ व त्यावर विदेशी पर्यटकांची मुले मिळून सुमारे पाचशेपेक्षा जास्त संख्येने पर्यटक (Tourists) सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी युक्रेन-रशिया यांच्‍यातील युद्धाचा परिणाम दिसून आला. ‘यमरुपी’ देशी पर्यटकाने विदेशी मैत्रिणीच्या साहाय्याने ‘नो वॉर, युक्रेन-रशिया’ अशा आशयाचे फलक दाखवून शांती, संयम राखण्‍याचे आवाहन केले. (Goa Carnival Festival News Updates)

Goa Carnival Festival News Updates
कार्निव्हलसाठी नटली राजधानी पणजी

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाऱ्यावरील फामापा पॉईंटपासून सुरू झालेली शोभायात्रा पार-दांडो भागात पोचल्यावर समाप्त झाली. मोठ्या संख्‍येने विदेशी पर्यटकांचा भरणा असलेल्‍या या मिरवणुकीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. कित्येकांनी रंगबिरंगी पोशाख परिधान केला होता. संगीताचा बाज नव्हता, मात्र रंगांची उधळण सुरू होती. दरम्यान, यंदाच्या कार्निव्हलमध्ये कोविडवर मात केल्याचा आनंद दिसून आला. ही महामारी पुन्हा न येवो, असे मत आलेक्स (जर्मनी) यांनी व्‍यक्त केले. विदेशी पर्यटकांबरोबर देशी पर्यटकांनी सेल्फी घेत कार्निव्हलचा (Carnival Festival) आनंद लुटला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com