Goa Lok Sabha Election: भाजपकडून दक्षिण गोव्‍यात महिला उमेदवाराच्‍या घोषणेची औपचारिकता बाकी

Goa Lok Sabha Election: दक्षिणेत महिला उमेदवार देऊन प्रयोग करू नये, असा भाजपच्या एका गटाचा व्होरा आजही कायम आहे.
Election
ElectionDainik Gomantak

Goa Lok Sabha Election: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा होणे केवळ बाकी राहिले आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय कार्यकारी समितीने महिला उमेवारालाच पसंती दिली आहे.

भाजपचा उमेदवार निवडून आणण्याविषयी जबाबदारी स्वीकारण्यावरून घोळ सुरू होता. त्यामुळे हा प्रश्‍न केंद्रीय समितीनेच मार्गी लावला असून, दिलेला महिला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आता सर्व आमदारांवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

दक्षिणेत महिला उमेदवार देऊन प्रयोग करू नये, असा भाजपच्या एका गटाचा व्होरा आजही कायम आहे. परंतु ही भूमिका म्हणजे आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रकार असल्याचे दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे.

ग्राऊंड रिपोर्ट काहीही असला तरी दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः पंतप्रधान आणि गृहमंत्री दक्षिणेतील आमदारांवर सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उत्तर गोव्यातील उमेदवारी खासदार श्रीपाद नाईक यांना देऊन आता दोन आठवडे उलटले; तरीही भाजपकडून दक्षिण गोव्यातील उमेदवार कोण, याविषयी भाष्‍य करण्‍यात आलेले नाही.

Election
Smart City चे काम नक्की स्मार्ट आहे? डेडलाईन गाठण्यासाठी पणजीत घडलाय 'असा' प्रकार; स्थानिक म्हणाले वर्षभर तरी रस्ता..

त्यातूनच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. स्थानिक नेते उमेदवार कोणी असला तरी कमळ लक्षात घेऊन तो उमेदवार निवडून आणावा, असे सांगत आहेत.

परंतु दुसऱ्या बाजूला केडरचा उमेदवार द्यावा म्हणून जी काही मागणी एका गटाकडून जोर धरत आहे, ती मागणी दिल्लीश्‍वरांनी बाजूला ठेवली आहे.

महिला उमेदवारी देऊन देशभर महिलांना उमेदवारी देण्यात भाजप मागे नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळेच उच्चशिक्षीत महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा ही आता औपचारिकता राहिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हालचाली अशा:-

1. महिला उमेदवारांची नावे पाठवा म्हटल्यानंतर प्रदेश निवडणूक समितीने काढलेला वेळ पाहता केंद्रीय समितीनेच त्यावर दिल्लीतच निर्णय घेण्याचे निश्‍चित केले आहे.

2. नावे पाठवा असे स्वतः पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर स्थानिक नेत्यांनी त्याविषयी गंभीरपणे चर्चाही केली नाही, या बाबी दिल्लीतील नेत्यांना पचनी पडलेल्या नाहीत.

3. त्यामुळेच दिल्लीतून ठरवलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्याचा आणि दिल्लीतूनच एकूण नेत्यांच्या राजकीय हालचालींवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा राबविली जाण्याची दाट शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com