Smart City चे काम नक्की स्मार्ट आहे? डेडलाईन गाठण्यासाठी पणजीत घडलाय 'असा' प्रकार; स्थानिक म्हणाले वर्षभर तरी रस्ता..

Panjim Smart City: स्मार्ट सिटीचे काम 1200 कोटी रुपयांचे असून ते काम 2 ते 5 वर्षेही चालणार नाही, अशी स्थिती असल्याचेही उघड उघड बोलले जातेय.
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak

Panjim Smart City: मागील काही महिन्यांपासून राज्यात स्मार्ट सिटी आणि पणजीची दुर्दशा हे विधान गाजत असून नुकतीच हे काम पूर्णत्वास जाण्याची तारीख समजल्याने पणजीतील रहिवाश्यांसह सर्वानाच हायसे वाटले.

मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी पणजी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा यावेळीही त्यांनी, "गरज भासत असेल तर मनुष्यबळ वाढवा, पण काम अंतिम मुदतीत पूर्ण करा" अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

मात्र 31 मेची डेडलाईन गाठण्यासाठी पणजीत सुरु असलेल्या कामाच्या दर्जामध्ये कंत्राटदार कमालीची तडजोड करत असल्याचे समोर आलं आहे.

या निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने सल्लागार आणि कंत्राटदाराबाबत तीव्र शब्दात आक्षेप व्यक्त होतोय.

मार्केट परिसरात रस्त्याच्याकडेला अक्षरशः चिखलावर काँक्रीट टाकून पेव्हर्स टाकण्यात आले असून कंत्राटदारांचा गैरप्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत हे पेव्हर टाकण्याचे काम सुरु होते असा आरोप येथील जागृत नागरिकांनी केला आहे.

स्मार्ट सिटीचे काम 1200 कोटी रुपयांचे असून ते काम 2 ते 5 वर्षेही चालणार नाही, अशी स्थिती असल्याचेही उघड उघड बोलले जातेय.

Panjim Smart City
Arm's Prohibited In Goa: उत्तर आणि दक्षिण गोव्यात शस्त्रे बाळगण्यास बंदी; आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई

या अशा निकृष्ट दर्जाच्या कामावेळी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचा सल्लागार कुठे झोपला होता काय? असा संतप्त सवाल करत सरकारने तातडीने सल्लागार आणि कंत्राटदारावर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी आता पुढे येतेय.

दरम्यान सध्या पणजीत सांतिनेज या परिसरात स्मार्ट सिटीचे कामकाज सुरु असून 31 मे ही काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख गाठण्याच्या नादात रात्रंदिवस काम सुरु आहे.

या भागातील खोदाईमुळे जल वाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असून मागच्या काही दिवसांपासून महालक्ष्मी मंदिराकडील रहिवाश्यांना पाणी टंचाई सहन करावी लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com