प्रीमियर लीग क्रिकेट लिलावात अष्टपैलू दर्शन मिशाळला सर्वाधिक पसंती

रणजी कर्णधार स्नेहल कवठणकर आणि अष्टपैलू दीपराज गावकरलाही मोठी मागणी
दर्शन मिशाळ
दर्शन मिशाळDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू निवड लिलाव प्रक्रियेत गोव्याचा अष्टपैलू रणजीपटू दर्शन मिसाळ याला सर्वाधिक गुणांचा भाव मिळाला. त्याखालोखाल रणजी संघ कर्णधार स्नेहल कवठणकर व अष्टपैलू दीपराज गावकर यांना मागणी राहिली.

नवोदित खेळाडूंत फलंदाज मंथन खुटकर, ईशान गडेकर व अष्टपैलू मोहित रेडकर यांना पसंती राहिली. सहा संघांची तीन दिवसीय सामन्यांची स्पर्धा येत्या 20 एप्रिलपासून खेळली जाईल. त्यासाठी सोमवारी पर्वरी येथील जीसीए संकुलात निवड चाचणी लिलाव प्रक्रिया झाली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामने 6 ते 8 मे या कालावधीत, तर अंतिम सामना 11 ते 13 मे या कालावधीत कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होईल. याशिवाय सांगे येथील जीसीए मैदानावरही सामने खेळले जातील.

दर्शन मिशाळ
आमच्या विरोधात घोषणा देणे चुकीचे: शेख बशीर

दर्शनला संघात घेण्यासाठी चौगुले व एमसीसी या संघांत चढाओढ होती. अखेरीस दर्शनला चौगुले क्लबने 20,200 गुणांसह आपल्या संघात घेतले. स्नेहलसाठी धेंपो क्लब व जीनो क्लब यांच्यात चुरस होती. त्यात धेंपो क्लबने शैलीदार फलंदाजास 19,400 गुणांचा भाव दिला. दीपराजला करिमाबाद क्लबने 17,000 गुण देत संघात घेतले. मंथनसाठी एमसीसी संघाने 15,400 गुण, ईशानसाठी साळगावकर क्लबने 15,200 गुण, तर मोहितसाठी जीनो क्लबने 15,000 गुण मोजले.

दर्शन मिशाळ
स्वगृही परत या: मायकल लोबो

प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती

जीसीए सचिव विपुल फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या रणजी संघातील तिन्ही पाहुणे (व्यावसायिक) खेळाडू प्रीमियर लीगमध्ये खेळणार नाहीत. सुयश प्रभुदेसाईची आयपीएल स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघात निवड झाली असून याच संघात अमित यादव नेट बॉलर आहे, त्यामुळे ते दोघेही अनुपलब्ध आहेत. आदित्य कौशिक आजारी आहे, तर कौटुंबिक कारणास्तव लक्षय गर्गने अनुपलब्धता कळविली असून त्यास जीसीएने परवानगी दिली आहे.

स्पर्धेची गटवारी

गट अ: जीनो स्पोर्टस क्लब, चौगुले स्पोर्टस क्लब, धेंपो क्रिकेट क्लब

गट ब: करिमाबाद क्रिकेट क्लब, मडगाव क्रिकेट क्लब (एमसीसी), साळगावकर क्रिकेट क्लब

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com