आमच्या विरोधात घोषणा देणे चुकीचे: शेख बशीर

'गोवा संपूर्ण जगात शांतताप्रिय आहे'
All Goa Muslim jamat
All Goa Muslim jamatDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को बायणा इस्लामपूर मशिदीत रविवारी रात्री प्रार्थना (रोजा) सुरू असताना जमावाने येऊन आमच्या विरोधात घोषणा देणे एकदम चुकीचे आहे. असल्या समाजकंटकांवर पोलिस व सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अखिल गोवा मुस्लिम जमाव संघटनेने पत्रकार परिषदेतून केली आहे.

गोवा संपूर्ण जगात शांतताप्रिय आहे. यापूर्वी कधीच कोणत्याही धर्माच्या शोभायात्रेवर हल्ला झाला नसून, हा दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा समाजकंटकांचा डाव असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर यांनी सांगितले. यावेळी नियाज शेख, रियाज कादरी, अब्दुल वहाब उपस्थित होते.

All Goa Muslim jamat
स्वगृही परत या: मायकल लोबो

बशीर म्हणाले, सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव रात्री प्रार्थनेसाठी मशिदीत जातात. मात्र रविवारी वास्को इस्लामपूर मशिदीत एका जमावाने आपल्या यात्रेवर दगडफेक केल्याने मशिदीत येऊन आमच्या विरोधात घोषणा देणे हे त्या जमावाला शोभत नाही. तसेच मशिदीजवळ येऊन दोघांना मारहाण करण्यात आली. यात एका विशेष मुलाला जबर मारहाण करण्यात आली. जमावावर अजिबात दगडफेक झाली नसल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बशिर यांनी दिली. तर प्रकरण पोलिसांकडे पोहोचल्याने संबंधितावर कारवाई करावी, असे शेख बशीर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
Mapusa Bill Dispute Violence
Goa Government Employee Relief
Goa Weather Forecast IMD
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com