'भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्रित यावे'

अशी हाक मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्याचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कार्यरत असलेल्या भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्रित यावे आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नातील गोवा साकारण्यासाठी मगो - तृणमूल युतीला साथ द्या, अशी हाक मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी मारली आहे. (Sudin Dhavalikar Latest News)

Sudin Dhavalikar
गुरुवारी गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट 40.88% तर रिकव्हरी रेट 88.2%

बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी भाजपचे वाभाडे काढून गोमंतकीयांना मुर्ख बनवणाऱ्या भाजपला यावेळेला खाली खेचा, आता तरी जागे व्हा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत मगो केंद्रीय कार्यकारिणीचे प्रताप फडते, नरेश गावडे, दिलेश गावकर तसेच विजय गावकर आदी उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, भाजपला (BJP) पराभव स्पष्ट दिसू लागल्याने मगोच्या उमेदवारांच्या घरी भाजपचे तथाकथित नेते जाऊन पायऱ्या झिजवत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्वनिष्ठ भाजपची नीतिमूल्ये गोव्यात या लोकांनी पायदळी तुडवली असून या लोकांना आता घरचा रस्ता दाखवावा लागणार आहे. भाजपकडून सध्या अफवा पसरवल्या जात आहेत. आर भारत नावाच्या वाहिनीद्वारे तर खोट्या बातम्या पसरवल्या जात असून त्याच्या मागे कोण आहे, हे आता गोमंतकीयांना चांगलेच कळले आहे. मगो आणि तृणमूल (TMC) युतीचा संभाव्य मुख्यमंत्री अजून ठरलेला नाही. योग्य वेळ आल्यावर ते जाहीर करू असेही त्यांनी नमूद केले.

Sudin Dhavalikar
देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत उत्तर गोवा

उमेदवारीसाठी सुट्टीचा अडसर

गोवा विधानसभेची उमेदवारी दाखल करण्यासाठी सध्या सुट्टीचा अडसर ठरला आहे. मतदान अवघ्या पंचवीस दिवसांवर आले आहे. त्यातच उमेदवारी दाखल करण्यासाठी दिलेल्या तारखांत शनिवार 22 व रविवार 23 तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी आहे, त्यामुळे कोविड महामारीचा धोका ओळखून उमेदवारी दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी व रविवारी परवानगी द्यावी, अशी मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com