GMC : गोमेकॉत 'आयव्हीएफ'ने 13 जणींना अपत्यप्राप्तीचे सुख, गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा

IVF Technology : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ) आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिली टेस्ट ट्यूब बेबी यशस्वीरीत्या जन्माला घातली आहे.
IVF Technology
IVF TechnologyDainik Gomantak
Published on
Updated on

GMC Test Tube Baby

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ) आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिली टेस्ट ट्यूब बेबी यशस्वीरीत्या जन्माला घातली आहे तर अजून १३ अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती तसेच महिलांना गर्भधारणेचा आनंद मिळणार आहे, अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

१३ जोडपी गर्भधारणेसाठी पॉझिटीव्ह असून सध्या ५० जोडप्यांची ‘गोमेकॉ’मध्ये ‘आयव्हीएफ’ उपचारांसाठी नोंदणी केली आहे.

गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील हा ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, राज्यातील अनेक जोडप्यांना या उपचारामुळे अपत्यप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला आहे. आयव्हीएफ प्रक्रियेचा यशस्वी वापर केल्यामुळे गोमेकॉने राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान मजबूत केले आहे.

IVF Technology
Goa Police Traffic Advisory: पणजी, कळंगुट, हणजूणमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता; वाहतूक खात्याकडून प्रवाशांसाठी सूचना जारी

गोमेकॉने आयव्हीएफ उपचारांचे केंद्र आणखी सक्षम करण्याचा मानस व्यक्त केला असून, भविष्यात राज्यातील जोडप्यांना संपूर्ण तांत्रिक आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे स्पष्ट केले आहे.

IVF Technology
Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

गोमेकॉमध्ये केवळ ‘आयव्हीएफ’च नाही तर आरोग्यसेवेच्या इतर क्षेत्रांमध्येही नवनवीन विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे. डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले की, गॅस्ट्रो एंटेरोलॉजी एंडोस्कोपी, स्कल बेस्ड सर्जरी आणि हँड सर्जरी या तीन नवीन विभागांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी रिलायन्स हॉस्पिटल आणि स्वीडिश कंपनीशी करार केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com