Goa Political News: मंत्रिपदासाठी भाजपात आलो नाही! ही केवळ अफवा

Goa Political News: जनमतानुसारच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.
Aleixo Sequeira
Aleixo SequeiraDainik Gomantak

Goa Political News: विधानसभेला काँग्रेसमधून आपणास ऐनवेळी उमेदवारी दिली. चर्चमुळे आपणास उमेदवारी मिळाली नाही, परंतु निवडणुकीत आपणास चर्चने मदत केली. (Nuvem) नुवेतील जनतेची मते विचारात घेतल्यानंतरच आपण भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपकडून आपणास कोणतीही मंत्रिपदाची ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मंत्रिपदामुळेच आपण भाजपामध्ये आल्याची ही अफवा आहे, असे सांगत ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी दैनिक ‘गोमन्तक`च्या ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली.

दरम्यान, मुलाखतीत सिक्वेरा यांनी भाजपमधील प्रवेशाबद्दल त्यांच्याविषयी उठलेल्या अफवा आणि काँग्रेसमधील राजकीय स्थितीवर भाष्य केले. नुवे मतदारसंघ हा भाजपचा पाठीराखा राहिला नाही, तरीही भाजपमध्ये येण्याचा निर्णय हा `डिफिकल्ट (Difficult)' होता, असे सांगत सिक्वेरा सांगतात, मतदारांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करणारा माणूस आहे. एका बाजूला कामाची पूर्तता करणे आणि दुसऱ्या बाजूला कामे झाली नाही तरी पक्षात रहा, असे सांगणारे पाठीराखे होते.

Aleixo Sequeira
Goa उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची 'AIMA'च्या अध्यक्षपदी निवड

सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस सत्तेत येईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. आपण निवडणुकीपूर्वी नुवेतील मतदारांना दिलेली आश्‍वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान आपल्यापुढे होते. त्यामुळे आपणास भाजपात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. आपण मतदारसंघातील जनतेची मते जाणूनच निर्णय घेतला. साडेचार वर्षे बाकी आहेत आणि बरेच काही करण्यासारखे आहे. त्यामुळे आताच पुढचा विचार करणे योग्य नाही.

आपण जबाबदारी कशी घेणार?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश येण्याचे कारण विचारल्यानंतर सिक्वेरा म्हणतात, त्याचे कारण आपणास माहीत नाही. परंतु नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपणास त्यांनी उमेदवारी देऊन आपणावर उपकार केले काय? असा सवाल त्यांनी केला. पक्षात कार्याध्यक्ष असतानाही आपणास अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली गेली, हे लक्षात घ्यायला हवे.

Aleixo Sequeira
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीची अधिसूचना जारी; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जे काही झाले त्याची जबाबदारी आपण घेणार नाही. आपली काहीच भूमिका राहिली नाही, तर जबाबदारी कशी घेणार? काँग्रेस पक्ष हा गंभीर नाही, असे म्हणणार नाही. आपणास सोनिया गांधी, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम, एदुआर्द फालेरो, मार्गारेट अल्वा यांनी आदराने वागविले. पक्षाचा कार्याध्यक्ष असतानाही आपली राहुल गांधी यांच्याशी भेट झाली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Aleixo Sequeira
Goa BJP: डिचोलीतील 15 क्षयरोग रुग्ण भाजपकडून दत्तक!

...ही राजकीय आत्महत्या?

भाजपमध्ये प्रवेश केल्याने ती राजकीय आत्महत्या म्हणायची का? यावर सिक्वेरा म्हणतात, की ही राजकीय आत्महत्या नाही. आणखी साडेचार वर्षे काम करण्याची संधी आहे. या काळात आपण घेतलेला निर्णय लोकांना पटवून देऊ शकतो. भाजपने आपणास कोणतेही आश्‍वासन दिलेले नाही. आपणास मंत्रिपद देणार असल्याच्या या अफवा आहेत, असे सांगत सिक्वेरा यांनी `धूर येतो, तेथे आग लागलेली असते,’ असे खरे असले तरी आपणास धूर कोठून येतो, हे माहीतच नाही, असे सांगत आपल्याविषयीच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले.

इतर संस्थांप्रमाणे चर्चचीही सरकारकडे कामे असतात. आपण चर्चजवळचा असलो, तरी आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या काळात मंत्री असताना चर्चचे कोणतेही काम घेऊन गेलो नाही. चर्चची काही प्रकरणे असतील, तर ते न्यायालयात जातील. निवडणुकीवेळी अनेक ख्रिस्ती प्रिस्टनी आपणास मदत केली.

Aleixo Sequeira
Goa Politics | आपल्या मतदारसंघासाठी विश्वजित करतात सरकारचा वापर - बर्डे | Gomantak Tv

इतर संस्थांप्रमाणे चर्चचीदेखील सरकारकडे कामे!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अद्याप त्यांना भेटलेलो नाही, असे स्पष्टीकरण सिक्वेरा देतात. लवकरच आपण आपल्या मतदारसंघातील लोकांना भेटणार आहोत. त्याशिवाय आपण घराबाहेर पोलिसांना ठेवलेले नव्हते. आपण भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय एकदम कठीण होता. आपल्याविरोधात कोण आहेत, असा सवाल उपस्थित करीत सिक्वेरा म्हणाले, जे आहेत ते सर्व निवडणुकीत पराभूत झालेले आहेत, हे लक्षात घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com