Goa उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची 'AIMA'च्या अध्यक्षपदी निवड

AIMA: निखिल साहनी वरिष्ठ उपाध्यक्षपदी व सुनीता रेड्डी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
Shrinivas Dempo
Shrinivas DempoDainik Gomantak
Published on
Updated on

All India Management Association: राष्ट्रीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या (एआयएमए) अध्यक्षपदी ख्‍यातनाम गोमंतकीय उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची निवड झाली आहे. त्यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष सी. के. रंगनाथन आणि व्यवस्थापकीय संचालक केविन कारे यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला. निखिल साहनी वरिष्ठ उपाध्यक्षपदी व सुनीता रेड्डी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

श्रीनिवास धेंपे हे ‘धेंपे ग्रुप ऑफ कंपनी’चे अध्यक्ष असून, पेट्रोलियम, कोक, जहाजबांधणी, अन्नप्रक्रिया, रियल इस्टेट आणि वृत्तपत्र प्रकाशन यासारख्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. ते गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर कार्यरत आहेत. शिवाय चार्ल्स कुरैया फाउंडेशन, गोवा कॅन्सर सोसायटीचे देखील ते अध्यक्ष आहेत. याशिवाय अनेक बिगर सरकारी संस्थांशी संबंधित आहेत.

श्रीनिवास हे धेंपे चॅरिटी ट्रस्ट आणि वसंतराव धेंपे एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन (Education and Research Foundation) अंतर्गत उच्च शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि इतर विकासात्मक कार्यासाठी भरीव योगदान देत आहेत.

तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून उच्चशिक्षण घेतले असून, भारतातील व्यावसायिक संघटना तसेच नागरी संस्थांमधील प्रभावी कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. दरम्यान, धेंपे यांच्या निवडीबद्दल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुभवी व्यक्तिमत्वांची निवड-

त्रिवेणी टर्बाइन्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निखिल साहनी यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. तर अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक सुनीता रेड्डी नवीन उपाध्यक्ष म्हणून संस्थेत सामील झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com