मडगाव रेल्वे स्थानकावरुन दारू जप्त

गोवा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलिसांची धडक कारवाई
Police
Police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस सक्रिय झाले आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांचे विविध ठिकाणी छापे मारण्याचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसात पोलिसांनी (Police) अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स अशा अनेक बेकायदा वस्तू जप्त केल्या आहेत. यातच आता सोमवारी कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन 25,100 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 139 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. (Margao Railway Station Latest News)

Police
'या' नेत्यानंही उमेदवारी डावलून दिला उत्पल पर्रीकरांना पाठिंबा

गोवा (Goa) राज्यातील विविध ठिकाणी पोलिस छापे मारून बेकायदेशीर वस्तु जप्त करत आहेत. शुक्रवारी कोलवाळ पोलिसांनी वयलोवाडो-कोलवाळ येथे साठवून ठेवलेली 69 हजारांची दारू जप्त केली. तसेच पेढणे पोलिसांनी देखील 171 लिटर मद्य जप्त केले. हा मद्यसाठा एमएच 07 एजे 1272 या वाहनात लपवण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Police
फॉर्मेलीन माफियाला हाताशी धरून मला पराभूत करण्याचे काँग्रेसचे डावपेच

मागील काही दिवसात मुरगाव तालुक्यातील वेर्णा आणि वास्को (Vasco) पोलिसांनी धडक कारवाई करत एका रेस्टॉरंट मधून तसेच एका बारमधून एकूण 93 हजार 429 रुपयांची बेहिशोबी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बेहिशोबी मद्याच्या बाटल्या वास्कोच्या अबकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावर शुक्रवारी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) आचारसंहिता काळात शुक्रवार पर्यंत बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स आणि इतर बेकायदा वस्तू असा एकूण 2.44 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com