आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काही समविचारी पक्ष एकत्र येत निवडणूक लढताना दिसत आहेत.
दरम्यान अशातच गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मी पंजीम उमेदवारीसाठी टीएमसीची ऑफर नाकारली आहे परंतु माझ्या समर्थकांनी मला पर्रीकरांना उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास सांगितले आहे. तसेच भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी मी काम करणार असल्याचे मत मडकईकर यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.