गोव्यातील फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ आल्बिनो यांचे निधन

गोवा फुटबॉल असोसिएशनमध्ये (Goa Football Association) त्यांनी प्रशासकीय पातळीवर 1977 ते 2013 या कालावधीत विविध पदावर काम केले.
गोव्यातील फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ आल्बिनो वालिस यांचे निधन झाले
गोव्यातील फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ आल्बिनो वालिस यांचे निधन झालेDainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील (Goa) फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ (Football Lawyer) आल्बिनो वालिस यांचे निधन झाले. वास्को येथील ज्येष्ठ वकील 82 वर्षांचे होते. गोवा फुटबॉल असोसिएशनमध्ये (Goa Football Association) त्यांनी प्रशासकीय पातळीवर 1977 ते 2013 या कालावधीत विविध पदावर काम केले. जीएफएच्या अपील समितीचे प्रमुख या नात्याने त्यांचे काम उल्लेखनीय होते. फुटबॉलमधील तांत्रिक बाबी हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता.

गोव्यातील फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ आल्बिनो वालिस यांचे निधन झाले
गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका; गोवा कॉग्रेस करणार आंदोलन

राज्य सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या बक्षीबहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्कार आल्बिनो यांना 1997 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. राज्यातील फुटबॉलमध्ये त्यांची घटनात्मक तज्ज्ञ अशी ओळख होती. राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अपील समितीचे उपाध्यक्ष या नात्याने दोन मुदतीसाठी चार वर्षे त्यांनी काम केले.

गोव्यातील फुटबॉलविषयक कायदेतज्ज्ञ आल्बिनो वालिस यांचे निधन झाले
Goa : गोवा टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्याशिवाय पर्याय नाही

वास्कोतील पॅट्राँग स्पोर्टस क्लबचे आल्विनो आधारस्तंभ होते. त्यांच्या प्रेरणेने राज्यात 1976 साली महिला फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. गोवा महिला फुटबॉल असोसिएशनच्या घटनेचा मसुदा त्यांनीच तयार केला होता. वास्को स्पोर्टस क्लबचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. 1969 साली सुरू झालेल्या वास्कोतील जॉनी मेमोरियल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात आल्बिनो यांचा मोलाचा वाटा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com