Goa : गोवा टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्याशिवाय पर्याय नाही

गोवा टॅक्सींना डिजिटल मीटर (Digital Meter) बसवल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.
goa taxi
goa taxi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील (Goa ) टॅक्सीना (Taxis) आता डिजीटल मीटर (Digital Meter) बसवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. राज्यभरात किती टॅक्सींना असे डिजिटल मीटर बसवले त्‍याचा अहवाल येत्या 17 सप्टेंबरपर्यंत द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने आज (गुरुवारी) वाहतूक संचालकांना (Director of Transportation) दिला. (Taxis in Goa are required to be fitted with digital meters)

goa taxi
गोव्यातील गृहिणींचे वांदे: LPG गॅस दरात 25 रुपयांनी वाढ

आजवर केवळ 96 टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यात आले आहेत. टॅक्सींना डिजीटल मीटर्स बसविलेले नसतील त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण 20 मे 2021 पासून करणे बंद करण्यात आले आहे. ज्यांच्या परवान्याची मुदत 20 मे पूर्वी संपणार असेल त्यांना डिजिटल मीटर्स बसविण्यासंदर्भात वेळापत्रकात नमूद केलेल्या दिवसांपूर्वी मीटर्स बसविण्याची मुभा देण्यात आली आहे. डिजीटल मीटर्स बसविण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार ते बसविले नाहीत त्यांचा परवाना आपोआपच रद्द होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसविलेले असतील असे सरकारचे म्हणणे आहे.

ज्या टॅक्सीचा शेवटचा क्रमांक 0 किंवा 1 असेल त्यांनी1 जुलै ते 24 जुलै या काळात मीटर्स बसवावेत व ते न बसविल्यास 25 जुलैपासून परवाना आपोआपच रद्द होणार आहे. त्याचप्रमाणे २ किंवा 3 क्रमांकासाठी 26 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 19 ऑगस्टनंतर परवाना रद्द, क्रमांक 4 किंवा 5 साठी 19 ऑगस्ट ते 11सप्टेंबर मुदत व मीटर्स न बसविल्यास 12 सप्टेंबरला परवाना रद्द, क्रमांक 6 किंवा 7 साठी 13 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 7 ऑक्टोबरला परवाना रद्द, क्रमांक 8 किंवा 9 साठी 7 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 1 नोव्हेंबरला आपोआपच परवाना रद्द होईल.

goa taxi
गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका; गोवा कॉग्रेस करणार आंदोलन

उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील टॅक्सींना डिजीटल मीटर्स बसविण्यासंदर्भात 7 मे रोजी दिलेल्या आदेशात सरकारला आणखी एक संधी देण्यात येत आहे, असे नमूद करून ही प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरू करा असे निर्देश दिले होते. ही मुदत येत्या 22 मे रोजी संपली आहे त्यापूर्वीच वाहतूक खात्याने 20 मे पासून डिजिटल मीटर्स असलेल्या टॅक्सींच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

goa taxi
Goa Covid 19: ‘कोविड’च्या मृत्यूदरात देशात गोवा तिसरा

डिजिटल मीटर्ससोबत काय असेल

मीटर्ससह ऑटोमोटिव्ह ट्रॅकिंग यंत्र (एटीएम), पॅनिक बटन (इमर्जन्सी सिस्टीम) व प्रिंटर्स तसेच एक वर्षाची मोफत दुरुस्ती, एक वर्षाचा डेटा तसेच ऑनलाईन मॉनिटरींग शुल्क ज्यामध्ये जीएसटीचा समावेश आहे. एकूण खर्च सुमारे 11 व हजार 234 रुपये आहे. डिजीटल मीटर्स बसविल्यानंतर टॅक्सी मालकाने जवळच्या वजन मापे कार्यालयाशी जाऊन हे मीटर्स प्रमाणित घेणे सक्तीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com