Sindhudurg: सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ काळतोंड्या साप, Viral Video

Sindhudurg Viral Video: समीर प्रकाश नारकर यांना दुर्मिळ काळतोंड्या साप आढळून आला आहे. काळतोंड्या बिनविषारी आणि लाजऱ्या स्वभावाचा साप म्हणून ओळखला जातो.
Rare Dumeril's Black-headed Snake Found in Sindhudurg
Dumeril's Black-headed SnakeDainik Gomantak
Published on
Updated on

Dumeril's Black-Headed Snake

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ काळतोंड्या साप आढळून आला आहे. देवगड मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ समीर प्रकाश नारकर यांना हा साप आढळून आला. काळतोंड्या बिनविषारी असून तो दाट जंगल आणि गवताळ भागांमध्ये राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर प्रकाश नारकर यांना दुर्मिळ काळतोंड्या साप आढळून आला आहे. काळतोंड्या बिनविषारी आणि लाजऱ्या स्वभावाचा साप म्हणून ओळखला जातो. देवगड मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ हा साप आढळून आला. हा साप अंदाजे २५ ते ३० सेंमी लांब असून त्याच्या डोक्यावर काळ्या रंगाचा डाग असतो.

Rare Dumeril's Black-headed Snake Found in Sindhudurg
OLA Uber In Goa: गोव्यात ओला, उबेर सेवा येणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांची टॅक्सी प्रश्नावर महत्वाची माहिती

काळतोंड्या प्रामुख्याने दाट जंगल आणि गवताळ भागांमध्ये राहतो. त्याचा आहार प्रामुख्याने पाली आणि सापसुरळी असा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा साप फारच कमी वेळा आढळतो, त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com