Ola - Uber Service In Goa
Goa CM Pramod Sawant On Cab Service In the StateDainik Gomantak

OLA Uber In Goa: गोव्यात ओला, उबेर सेवा येणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांची टॅक्सी प्रश्नावर महत्वाची माहिती

Goa Taxi Issue: गोव्यात ओला, उबेर यांची कॅब सेवा येणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
Published on

पणजी: गोव्यात ओला, उबेर यासारखी कॅब सेवा येणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील टॅक्सीचा मुद्दा सर्वांना विश्वासात घेऊन सोडवला जाईल. नागरिकांना गैरसमज करुन घेऊ नये, असे सावंत म्हणाले. वादग्रस्त कॅब ॲग्रिगेटर मुद्दावरुन टॅक्सी चालक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट केली.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी टॅक्सी व्यावसायिकांसोबत मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो उपस्थित होते.

राज्य सरकारच्या प्रस्तावित 'कॅब ॲग्रिगेटर धोरणा'च्या विरोधात सध्या स्थानिक पारंपरिक टॅक्सीचालकांनी दंड थोपटले आहेत. धोरणाविरोधात टॅक्सीचालक रस्त्यावर उतरले असून, धोरण रद्द करण्याची मागणी करत यासाठी आरपारची लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे.

नव्या धोरणानुसार राज्यात ओला, उबेर सारखी कॅब सेवा राज्यात आल्यास स्थानिक चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या धोरणाला विरोध होत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करत ओला, उबेर राज्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Ola - Uber Service In Goa
Goa News: ऑनलाईन जुगारात झाला मोठा लॉस, उसने घेतलेले पैसेही गमावले; नैराश्यात गेलेल्या 19 वर्षीय मुलाने संपवले आयुष्य

राज्यात ओला, उबेर येणार नाही, नागरिकांना गैरसमज करु नये. याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पारंपरिक टॅक्सी चालकांनी लोबो यांच्या घरासमोर आंदोलन करत त्यांना देखील या धोरणाला विरोध करण्याचे आवाहन करत टॅक्सी चालकांसोबत उभे राहण्याची विनंती करण्यात आली.

टॅक्सी चालक सरकारच्या प्रस्तावित 'कॅब ॲग्रिगेटर' धोरणाविरोधात आक्रमक झाले असून, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ॲपबेस कॅबवर येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील कॅब ॲग्रिगेटर धोरण वेगळं असल्याचे म्हटले असून, लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com