G20 Summit 2023 : देशातील समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकण्याबरोबर पर्यटनस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी एआरबीएनबीने सोमवारी (ता.१९) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामुळे ‘हेरिटेज स्टे’ला प्रोत्साहन मिळणार आहे.
केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, पर्यटन सचिव व्ही. विद्यावती, अतिरिक्त सचिव राकेश कुमार वर्मा, एआरबीएनबीच्या भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग व तैवान विभागाचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
देशातील वारसास्थळांचे सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात आणणे आणि देशातील वैविध्यपूर्ण वारशाच्या माध्यमातून एका अविस्मरणीय प्रवासासाठी सज्ज होण्यास पर्यटकांना प्रोत्साहन देणे, हा याचा उद्देश आहे.
‘सोल ऑफ इंडिया’ मायक्रोसाइट - भारतभरातील वारसागृहांची जाहिरात करण्यासाठी तसेच ही वारसास्थळे व वास्तूंच्या मागील खिळवून ठेवणाऱ्या कहाण्या सर्वांना सांगण्यासाठी एआरबीएनबी ‘सोल ऑफ इंडिया’ या नावाने समर्पित मायक्रोसाइट सुरू करणार आहे. तसेच एआरबीएनबी प्रवास व होम स्टेबद्दलची माहितीही पर्यटन मंत्रालयाला देईल.
काय आहे करार?
सांस्कृतिक व वारसाविषयक पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्वांत जास्त मागणी असलेले क्षेत्र म्हणून भारताला प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय व एआरबीएनबी एकत्रितपणे काम करतील. देशभरात उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वारसागृहांचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने आखलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभियानांचा लाभ यासाठी घेतला जाईल.
मच्छीमारांचा विकास
चौपाटी पर्यटन, दीपगृह पर्यटन आणि क्रूझ पर्यटनाद्वारे किनारी पर्यटनाला चालना मिळेल. मच्छीमारांच्या उत्पन्नात भर पडेल. भारत सरकारने ७५ पेक्षा जास्त दीपगृहांच्या जवळच्या क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे, असे रेड्डी पर्यटनविषयक कृतिगटाच्या चौथ्या बैठकीला ‘क्रुझ पर्यटनाला शाश्वत आणि जबाबदार प्रवासासाठीचा प्रोत्साहन देणे’ या विषयावर ते बोलत होते.
‘अतिथी देवो भव’ या पुरातन वचनामध्ये पाहुण्यांना देवाचे स्थान दिले आहे आणि या पाहुण्यांना स्थानिक समुदायांसोबत त्यांच्याच घरात राहण्याची सुविधा देण्यात येईल. ‘होम स्टे’ निवास प्रवाशांना सांस्कृतिक प्रवासाचा अनुभव मिळेल.
- जी. किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटनमंत्री
गोव्यामधील वास्तुकला ही चित्ताकर्षक पोर्तुगीज बंगले आणि आधुनिक हॉटेल्स यांचा मीलाफ आहे. कार्निव्हल, सनबर्न फेस्टिव्हलसारख्या महोत्सवांसाठीही गोवा राज्य ओळखले जाते. त्यामुळे जगभरातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन या महोत्सवांतून घडते आणि त्यामुळे पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव मिळतो.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.