Ashwem Crime: 'तो' फुकटा अधिकारी निघाला तोतया; रिसॉर्टला लावला 2.09 लाखांचा चुना

Fake Government Official Arrest Ashwem: सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आश्वेमधील एका बीच रिसॉर्टची २.०९ लाख रुपयांची फसवणूक केली
Ashwem | Ashwem Crime | Ashwem Beach resort | Goa Police
Fake Government Official Arrest Dainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे : गोवा पोलिसांनी हरियाणामधील एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या इसमाला अटक केली आहे.फरिदाबादचा रहिवासी असलेल्या मिरनांक सिंग याने स्वतः एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आश्वेमधील एका बीच रिसॉर्टची २.०९ लाख रुपयांची फसवणूक केली. शिवाय आपण सरकारी अधिकारी असल्याचे सांगून २ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत बीच रिसॉर्टकडून नि:शुल्क निवास आणि सुविधा उपलब्ध करवून घेतल्या.

एक सरकारी अधिकारी असल्याचं भासवून मिरनांक सिंग याने बीच रिसॉर्टमधून तीन-चार दिवसांसाठी निवासीची तसेच इतर सुविधांची सोय करवून घेतली, शेवटी रिसॉर्ट सोडण्याच्यावेळी संशयित आरोपी मिरनांक सिंग याने एकूण २.०९ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची बाब उघड झाली.

Ashwem | Ashwem Crime | Ashwem Beach resort | Goa Police
Calangute Crime: शॅक्समालकांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

रिसॉर्टवाल्यांनी देखील याची माहिती मिळताच ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आणि म्हणूनच वेळीच आरोपी पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

यापूर्वी कळंगुट परिसरातील शॅक्‍स तसेच क्लबचालकांना ‘आयएएस’ अधिकारी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणाऱ्या व त्यांची आस्थापने बंद करण्याची धमकी देणाऱ्या मनोज कुमार (वय ३१ वर्षे, रा. छत्तीसगड) याला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com